Multibagger Stock : बालाजी टेलिफिल्म्स शेअर्सचा वर्षभरात 250 टक्के परतावा; आता 214 कोटी उभारण्याचा मानस

बालाजी टेलिफिल्म्सने (Balaji Telefilms) कन्वर्टिबल वॉरंट जारी करून निधी उभारण्याची घोषणा केली आहे.
Multibagger Stock
Multibagger Stocksakal
Updated on

बालाजी टेलिफिल्म्सने (Balaji Telefilms) कन्वर्टिबल वॉरंट जारी करून निधी उभारण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या बोर्डाने प्रेफरन्शियल बेसिसवर 2.38 कोटींहून अधिक कन्वर्टिबल वॉरंट जारी करण्यास मान्यता दिली आहे. अशा स्थितीत कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली अॅक्शन दिसू शकते. यासाठी वॉरंटची किंमत 89.60 रुपये निश्चित करण्यात आली आहे. यातून 214 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. सध्या हे शेअर्स 129.69 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

Multibagger Stock
Multibagger Stock: तुम्ही असा मल्टीबॅगर पाहिला नसेल; 5 वर्षांत दिला 'इतका' परतावा, आता केमिकल व्यवसायात प्रवेश करणार

गेल्या एका महिन्यात बालाजी टेलिफिल्म्सचे शेअर्स सुमारे 40 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत 144 टक्के इतका नफा झाला आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सने 73 टक्के नफा कमावला आहे. हा शेअर गेल्या वर्षभरात 250 टक्क्यांनी वाढला आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीची प्रोडक्शन कॉस्ट 101.70 कोटी होती, जी मागील तिमाहीत 147.5 कोटी आणि गेल्या आर्थिक वर्षाच्या त्याच तिमाहीत 135.7 कोटी होती. याव्यतिरिक्त, कंपनीचे एकूण मार्जिन गेल्या वर्षीच्या 29.70 कोटींवरून वाढून 36.60 कोटी झाले. कंपनीचे वार्षिक EBITDA मार्जिन 3 टक्क्यांवर स्थिर राहिले.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.