Bangladesh Crisis: बांगलादेश संकटामुळे 16 भारतीय कंपन्यांचे भवितव्य धोक्यात? शेअर बाजारात मोठी उलथापालथ

Indian Companies in Bangladesh: भारताच्या शेजारील बांगलादेशात मोठे राजकीय संकट सुरूच आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडून सध्या भारतात आश्रय घेतला आहे. भारताच्या शेजारील बांगलादेशात मोठे राजकीय संकट सुरूच आहे.
Bangladesh Crisis
Bangladesh Related StocksSakal
Updated on

Bangladesh Related Stocks: भारताच्या शेजारील बांगलादेशात मोठे राजकीय संकट सुरू आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडून सध्या भारतात आश्रय घेतला आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेक भारतीय कंपन्यांचे भवितव्यही धोक्यात आले आहे. यापैकी अनेक स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट कंपन्या आहेत. बांगलादेशच्या संकटामुळे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

बांगलादेशात हिंसक आंदोलनानंतर देशात प्रचंड गदारोळ माजला आहे. या संकटाची झळ भारतातही जाणवत आहे. मंगळवारी सफोला खाद्यतेल उत्पादक कंपनी मॅरिकोचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक घसरले. याचे कारण आता बांगलादेशातील विक्रीवर नकारात्मक परिणाम दिसू शकतो. बांगलादेशमधून कंपनीला सुमारे 12 टक्के महसूल मिळतो.

तर पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीजने बांगलादेशातील त्यांची कार्यालये तात्पुरती बंद केली आहेत. त्यामुळे कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. त्याचप्रमाणे इमामीचे शेअर्सही 4 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

Bangladesh Crisis
Indexation: अर्थसंकल्पात लागू केला होता नवा नियम; लोकांची नाराजी पाहून अर्थमंत्र्यांनी बदलला निर्णय, कोणाला होणार फायदा?

कोणत्या कंपन्यांचा बांगलादेशात व्यवसाय?

पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज, इमामी, बायर कॉर्प, जीसीपीएल, ब्रिटानिया, विकास लाइफकेअर, डाबर, एशियन पेंट्स, पिडीलाइट, ज्युबिलंट फूडवर्क्स, व्हीआयपी, पिडीलाइट, टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प आणि बजाज ऑटो यासह इतर अनेक कंपन्या देखील बांगलादेशमध्ये व्यवसाय करतात.

Bangladesh Crisis
Rahul Gandhi: शेअर मार्केट कोमात पण राहुल गांधी जोमात! 'या' कंपनीच्या शेअरमुळे केली छप्परफाड कमाई

गारमेंट कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली

प्रभुदास लिलाधरचे विक्रम कसाट म्हणाले की, बांगलादेशातील अशांतता चिंताजनक आहे. बांगलादेशात कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांबद्दल आम्हाला चिंता आहे. सूत निर्यातदारांनाही धक्का बसू शकतो. भारताच्या सूत निर्यातीत बांगलादेशचा वाटा सध्या 25 ते 30 टक्के आहे. मात्र, सध्या गारमेंट कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आहे.

गोकलदास एक्स्पोर्ट्सचे शेअर्स 18 टक्के, केपीआर मिल्सचे 16 टक्के, अरविंद लिमिटेडचे ​​11 टक्के, एसपी ॲपेरेल्सचे 18 टक्के, सेंच्युरी एन्का 20 टक्के, काईटेक्स गारमेंट्स 16 टक्के आणि नाहर स्पिनिंगचे शेअर 14 टक्क्यांनी वाढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.