पुण्यातील ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बेलराईज इंडस्ट्रीज (Belrise Industries) आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. कंपनीने यासाठी बाजार नियामक सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल केली आहेत. पब्लिक इश्यूद्वारे 2150 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. या आयपीओअंतर्गत, फक्त नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील आणि विक्रीसाठी ऑफर (OFS) नाही. म्हणजे आयपीओमधून मिळणारी संपूर्ण रक्कम कंपनीकडे जाईल.