NSE Warning: एनएसईने दिला इशारा! स्टॉक गुंतवणूकदारांनो 'या' इंस्टाग्राम आणि टेलिग्राम चॅनेलपासून रहा सावध

National Stock Exchange: शेअर बाजारातील फसवणूक रोखण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) गुंतवणूकदारांना इशारा दिला आहे. NSEने गुंतवणूकदारांना काही टेलिग्राम चॅनेल आणि इंस्टाग्राम चॅनेलबद्दल सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
National Stock Exchange
National Stock ExchangeSakal
Updated on

National Stock Exchange: शेअर बाजारातील फसवणूक रोखण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) गुंतवणूकदारांना इशारा दिला आहे. NSEने गुंतवणूकदारांना काही टेलिग्राम चॅनेल आणि इंस्टाग्राम चॅनेलबद्दल सावध राहण्याचा इशारा दिला आहे. गुंतवणूकदारांनी या चॅनेलच्या सल्ल्यानुसार गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नयेत, असे एनएसईने म्हटले आहे. याशिवाय NSE ने गुंतवणुकदारांना बेकायदेशीर ट्रेडिंग सेवा पुरवणाऱ्या कंपनीबद्दल इशारा दिला आहे.

NSE ने म्हटले आहे की टेलिग्राम आणि इंस्टाग्रामद्वारे मिळालेल्या सल्ल्यांनुसार गुंतवणूक करु नका. एका निवेदनात, NSE ने इंस्टाग्रामवर BSE NSE लेटेस्ट (bse_nse_latest) आणि टेलिग्रामवर भारत टार्डिंग यात्रा (BHARAT TARDING YATRA) बद्दल इशारा दिला आहे.

National Stock Exchange
Most Expensive Cities: मुंबई भारतातील सर्वात महागडे शहर; पुणे कोणत्या नंबरवर? पहा संपूर्ण यादी

गुंतवणूकदारांनी खात्रीशीर परतावा देणाऱ्यांपासून दूर राहावे

स्टॉक एक्स्चेंजने सांगितले की गुंतवणूकदारांनी स्टॉक मार्केटमध्ये खात्रीशीर परताव्याचे आश्वासन देणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेपासून दूर राहावे. तसेच, गुंतवणूकदारांनी त्यांचा आयडी आणि पासवर्ड कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला शेअर करू नये. यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. NSE वेळोवेळी अवैध व्यापार करणाऱ्या संस्थांच्या मोबाईल नंबरची माहिती देत ​​असते.

National Stock Exchange
LIC: एलआयसी विकणार मुंबईसह 'या' शहरांमधील मालमत्ता; कंपनीवर ही वेळ का आली?

NSE ने सांगितले की, आदित्य नावाच्या व्यक्तीबद्दल माहिती मिळाली आहे. तो Bear & Bull PLATFORM आणि Easy Trade सारख्या कंपन्यांशी संबंधित आहे. या कंपन्या बेकायदेशीर व्यापार सेवा देतात. स्टॉक एक्स्चेंजने त्यांचे मोबाईल क्रमांक 8485855849 आणि 9624495573 दिले आहेत. स्टॉक एक्स्चेंजने त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. NSE ने सांगितले की गुंतवणूकदार नोंदणीकृत सदस्यांची माहिती www.nseindia.com/invest/find-a-stock-broker ला भेट देऊन मिळवू शकतो.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.