Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Stock Price Increas : भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडने बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये 88 टक्क्यांची तेजी आली आहे, जो तिचा पहिला बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिट आहे.
Bharat Global Developers :
Bharat Global Developers :sakal
Updated on

भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडने (BGDL) आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या शेअरहोल्डर्सना 8:10 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करेल. याशिवाय 1:10 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिटचा निर्णयही घेण्यात आला आहे. दरम्यान, सलग 12 व्या दिवशी कंपनीच्या शेअर्सने अप्पर सर्कीटला धडक दिली. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 88 टक्क्यांची मजबूत तेजी आली आहे. भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडचा हा पहिला बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिट आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.