IPO News Update : भारती हेक्साकॉमचा आयपीओ येणार, सेबीची मंजुरी...

भारती एअरटेलची (Bharti Airtel) उपकंपनी भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) लवकरच आपला आयपीओ बाजारात आणणार आहे. बाजार नियामक सेबीने आयपीओ लाँच करण्यास त्यांना मान्यता दिली आहे.
IPO News Update
IPO News Update sakal
Updated on

भारती एअरटेलची (Bharti Airtel) उपकंपनी भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) लवकरच आपला आयपीओ बाजारात आणणार आहे. बाजार नियामक सेबीने आयपीओ लाँच करण्यास त्यांना मान्यता दिली आहे. हेक्साकॉमच्या आयपीओमध्ये कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत आणि ते पूर्णपणे ऑफर-फॉर-सेलवर (OFS) आधारित असेल. ऑफर-फॉर-सेलद्वारे (OFS), कंपनीचा एकमेव सार्वजनिक भागधारक, टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड, त्याच्या 10 कोटी शेअर्सची विक्री करेल. याचा अर्थ असा आहे की आयपीओमधून मिळालेली संपूर्ण रक्कम कंपनीकडे जाणार नाही तर टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेडकडे जाईल.

भारती हेक्साकॉमने या वर्षी जानेवारीमध्ये बाजार नियामक सेबीकडे आयपीओसाठी कागदपत्रे सादर केली होती. कागदपत्रांनुसार, कंपनीची प्रमोटर भारती एअरटेलकडे 70 टक्के भागीदारी म्हणजेच सुमारे 35 कोटी शेअर्स आहेत. उर्वरित 30 टक्के हिस्सा नॉन-प्रमोटर, टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेडकडे आहे.

सेबीने 11 मार्चला त्यांच्या आयपपीओ अर्जावर एक ऑब्झर्वेशन लेटर जारी केले होते. एखाद्या कंपनीला आयपीओ लॉन्च करण्यासाठी सेबीकडून ऑब्झर्वेशन लेटर घेणे आवश्यक आहे. कंपनीकडे हे ऑब्झर्वेशन लेटर जारी केल्याच्या तारखेपासून 1 वर्षाचा कालावधी आहे. जर एखादी कंपनी या एका वर्षात आयपीओ लाँच करू शकली नाही, तर तिला आयपीओसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल.

भारती हेक्साकॉम राजस्थान आणि ईशान्येकडील राज्यांतील ग्राहकांना एअरटेल ब्रँड नावाखाली मोबाइल सेवा, फिक्स्ड लँडलाइन आणि ब्रॉडबँड यासारख्या दूरसंचार सेवा पुरवते. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, कंपनीने 549.2 कोटीचा निव्वळ नफा कमावला होता, जो मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 67.2 टक्के कमी होता. आर्थिक वर्ष 2022 मध्ये, कंपनीने 1,951.1 कोटीचा दमदार नफा नोंदवला होता. त्याच वेळी, त्याचा महसूल वार्षिक आधारावर 21.7 टक्क्यांनी वाढून 6,579 कोटी झाला आहे.

IPO News Update
IPO Open : विश्वास ॲग्री सीड्सचा आयपीओ 21 मार्चपासून खुला होणार, अधिक जाणून घेऊयात...

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक तुलनेत 64.6 टक्क्यांनी घसरून 69.1 कोटीवर आला आहे. याच कालावधीत महसूल 8 टक्क्यांनी वाढून 3,420.2 कोटीवर पोहोचला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.