बोंदाडा इंजिनिअरिंगच्या (Bondada Engineering) गुरुवारी 3 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. सध्या हा शेअर 0.57 टक्क्यांच्या वाढीसह 900 रुपयांवर व्यवहार करत आहे. कंपनीला एनएलसी इंडियाकडून 81 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. या बातमीने कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली. त्याची मार्केट कॅप 1,944.19 कोटी आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 949.95 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 142.50 रुपये आहे.
एनएलसी इंडिया लिमिटेडने एसओएनडब्ल्यू सोलर पॉवर प्रोजेक्टसाठी बॅलन्स ऑफ सिस्टीम (BOS) कामासाठी बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेडला वर्क ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरची किंमत 81 कोटी 34 लाख 02 हजार 405 रुपये आहे. हे काम 15 महिन्यांत पूर्ण करायचे आहे. याआधी फेब्रुवारी 2024 मध्ये कंपनीला सनड्रॉप्स एनर्जिया प्रायवेट लिमिटेडकडून 4 कोटीची सोलर पॉवर प्लांटसाठी उपकरणे पुरवण्याची ऑर्डर मिळाली होती.
बोंदाडा इंजिनीअरिंगच्या शेअर्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर 33% वाढला आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत, त्याच्या गुंतवणूकदारांना 475 टक्के इतका मोठा नफा मिळाला आहे. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 115 टक्क्यांनी वाढ झाली आहे, म्हणजेच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात 501 टक्के बंपर नफा झाला आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.