जे कुमार इंफ्राप्रोजेक्ट्सच्या शेअर्समधून मिळणार भरघोस परतावा, तुमच्याकडे आहेत का शेअर्स?

J Kumar Infraprojects: जे कुमार इंफ्राप्रोजेक्ट्सचे (J Kumar Infraprojects) शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. अशात आता ग्लोबल ब्रोकरेज फर्म सीएलएसएने (CLSA) सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनी जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्सची टारगेट प्राईस वाढवली आणि त्यामुळे कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली.
J Kumar Infraprojects
J Kumar InfraprojectsSakal
Updated on

J Kumar Infraprojects: जे कुमार इंफ्राप्रोजेक्ट्सचे (J Kumar Infraprojects) शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. अशात आता ग्लोबल ब्रोकरेज फर्म सीएलएसएने (CLSA) सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनी जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्सची टारगेट प्राईस वाढवली आणि त्यामुळे कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली.

हे शेअर्स 20 टक्क्यांच्या तेजीसह 593.20 रुपयांच्या अप्पर सर्किटवर पोहोचले आणि त्याच अप्पर सर्किटवर बंद झाले. हा देखील त्यांच्या शेअर्सचा विक्रमी उच्चांक आहे. ब्रोकरेजने त्यांच्या बाय रेटिंगमध्ये कोणताही बदल केला नाही पण टारगेट प्राईस वाढवल्याने शेअर्सवर दमदार परिणाम झाला. कंपनीची मार्केट कॅप 4,488.48 कोटी आहे.

ब्रोकरेज फर्म सीएलएसएने त्याचे टारगेट तब्बल 720 रुपये केले आहे. याचा अर्थ सध्याच्या किंमतीतही पैसे गुंतवून तुम्ही एका वर्षात उत्कृष्ट परतावा मिळवू शकता. शुक्रवारी हा शेअर बीएसईवर 494.35 रुपयांवर बंद झाला होता, याचा अर्थ ब्रोकरेजची टारगेट प्राईस शुक्रवारच्या बंद किंमतीपेक्षा 46 टक्के वर आहे.

आता बदलत्या हवामानानुसार इंफ्रास्ट्रक्चर तयार केले जात आहेत आणि त्यामुळे शहरांमधल्या कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. ज्याचा चांगला फायदा जे कुमार इन्फ्राला होईल, असा विश्वास ब्रोकरेजला आहे.

J Kumar Infraprojects
New Rule From 1 January: सिम कार्डपासून ते ITR पर्यंत जानेवारीपासून बदलणार 'हे' पाच नियम

या कंपनीला आर्थिक वर्ष 2024 साठी चांगल्या ऑर्डर मिळाल्या आहेत आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑर्डर 114 टक्क्यांनी वाढली आहे. ब्रोकरेजनुसार, कंपनी आपले उत्पन्न दुप्पट करण्याच्या स्थितीत आहे. हे पाहता, ब्रोकरेजने आर्थिक वर्ष 2025 साठी प्रति शेअर आय (EPS) अंदाज 11 टक्क्यांनी वाढवला आहे.

J Kumar Infraprojects
Adani Group: गणपत पाटील नगरमध्ये अदानी इलेक्ट्रिसिटीचा वीज देण्यास नकार; ग्रामस्थांनी काढला मोर्चा

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.