Stock Market: 20 मे रोजी मुंबईतील लोकसभा मतदानामुळे शेअर बाजार बंद राहणार का?

Stock Market Holiday: लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी प्रमुख शेअर बाजार BSE आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत.
BSE, NSE stock market Will be closed on Monday, May 20, for Mumbai elections
BSE, NSE stock market Will be closed on Monday, May 20, for Mumbai elections Sakal
Updated on

Stock Market Holiday: लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी प्रमुख शेअर बाजार BSE आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत. दोन्ही प्रमुख स्टॉक एक्स्चेंजने त्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. बीएसई आणि एनएसईने सांगितले की इक्विटी, फ्यूचर आणि ऑप्शनमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

दोन्ही शेअर बाजारांनी यासंदर्भात स्वतंत्र परिपत्रक जारी केले आहे. त्यात सांगितले की, मुंबईत सोमवार, 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीएसई आणि एनएसई 20 मे रोजी बंद राहणार आहेत.

पाचव्या टप्प्यात 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 49 लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील 14, महाराष्ट्रातील 13, पश्चिम बंगालमधील 7, बिहारमधील 5, ओडिशातील 5, झारखंडमधील 3, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी 1 जागांचा समावेश आहे. अशा स्थितीत सोमवारी या सर्व ठिकाणी बँकाही बंद राहणार आहेत.

BSE, NSE stock market Will be closed on Monday, May 20, for Mumbai elections
Ex-Wipro CEO: राजीनाम्यानंतर, विप्रोच्या सीईओने कंपनीचे शेअर्स विकून कमावले 70 कोटी; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात मतदान होणाऱ्या शहरांमध्ये बँका बंद राहतील, अशी अधिसूचना आरबीआयने आधीच जारी केली होती. अशा स्थितीत तुमचे एखादे काम या दरम्यान अडकले असेल तर ते शनिवारी पूर्ण करू शकता. 18 मे हा तिसरा शनिवार असल्याने या शनिवारी बँका सुरू असतात.

महाराष्ट्रात 'या' जागांवर मतदान होणार आहे

महाराष्ट्र: धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण.

BSE, NSE stock market Will be closed on Monday, May 20, for Mumbai elections
Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.