निवड दमदार शेअरची

खरे निकष धंद्यात लावलेला पैसा आणि त्यावरील परताव्याशी निगडित असणे आवश्‍यक
Share Market
Share MarketSakal
Updated on

सध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ दोघेही वारा प्यायलेल्या वासरासारखे सुसाट सुटले आहेत. कधी ते घोड्यासारखे चौखूर उधळत आहेत, तर कधी हरणासारख्या उड्या मारत आहेत, तर कधी त्यांची चाल हत्तीसारखे संथ आहे.

अशावेळी त्यांच्या या चालीचा योग्य अर्थ लावून घोडे कोण, हरणे कोण याचा मागोवा घेऊन, चांगले शेअर निवडले तर गुंतवणूकदारांची चांदी होऊ शकते. यासाठी अशा शेअरच्या किमान तीन वर्षांचा अभ्यास करावा लागेल आणि तोसुद्धा महत्त्वाचे निकष लावून.

महत्त्वाचे निकष :

शेअरमधील तेजी किंवा मंदी आजमावण्याचे अनेक निकष आहेत. मात्र, खरे निकष धंद्यात लावलेला पैसा आणि त्यावरील परताव्याशी निगडित असणे आवश्‍यक आहेत. त्यासाठी दोन निकष वापरले जातात.

कंपनीतील एकूण गुंतवणूक आणि त्यावरील गेल्या तीन वर्षांचा परतावा (ROCE) तीन वर्षांचे उत्पन्न आणि फायद्याचा आढावा (CAGR- तीन वर्षांची) (या दोन्ही निकषांमधील टक्केवारीची बेरीज हा मुख्य निकष तुलनेसाठी वापरला आहे.) बँकांना मात्र तीन वर्षांचा शेअरवरील परतावा हा निकष लावला आहे.

बँकेचे नाव - परतावा (टक्क्यांमध्ये)

ॲक्सिस - ११५

एचडीएफसी - ५१

इंडसइंड - १७४

कोटक - ४०

एसबीआय - २१७

वर्गवारी : या सर्व माहितीवरून ‘सेन्सेक्स’वरील शेअरची खालीलप्रमाणे वर्गवारी करता येऊ शकेल. यावरून कोणता शेअर ढोबळमानाने कसा वागू शकेल, याची कल्पना करता येऊ शकेल.

  • घोडे (दौडणारे) : ८0 टक्क्यांवरील..

  • हरणे (चपळ) : ५० ते ८० टक्क्यांपर्यंत

  • ससे (उड्या) : ३० ते ५० टक्क्यांपर्यंत

  • हत्ती, वाघ, सिंह : (सुस्त) (-) ते ३० टक्क्यांपर्यंत

आपल्याजवळ असणाऱ्या शेअरना वरील निकष लावून त्यांची वर्गवारी करता येऊ शकेल. तीन वर्षांचा निकष असल्याने फारसा फरक पडणार नाही.

‘सेन्सेक्स’मधील निवडक शेअरची निकष लावून विभागणी केली आहे.

कंपनी - निकष (टक्क्यांमध्ये)

  • एशियन पेंट्स -८६

  • बजाज फायनान्स -७१

  • बजाज फिनसर्व्ह- ८०

  • भारती एअरटेल -(२)

  • एचसीएल -६४

  • एचयुएल- ६४

  • इन्फोसिस -८६

  • आयटीसी -६८

  • एल अँड टी -३६

  • महिद्रा अँड महिंद्रा -१८२

  • मारुती -६१

  • नेस्ले- ८५

  • एनटीपीसी -५६

  • पॉवरग्रिड -४१

  • रिलायन्स -७०

  • सन फार्मा -७५

  • टाटा मोटर्स - (३२)

  • टीसीएस -८८

  • टेक महिंद्रा- ५४

  • टायटन -१२१

  • अल्ट्राटेक -२८

  • विप्रो -४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.