Same Day Share Settlement: सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) शेअर बाजारात त्याच दिवशी शेअर्सची सेटलमेंट लागू करण्याची मोठी घोषणा केली आहे. T+0 सेटलमेंट पद्धत 28 मार्च रोजी लाँच केली जाईल. सेटलमेंट सिस्टम म्हणजे खरेदीदाराच्या खात्यात शेअर्सचे अधिकृत हस्तांतरण आणि विक्रेत्याच्या खात्यात विकलेल्या शेअर्सचे पैसे त्याच दिवशी जमा होतील.
भारतीय शेअर बाजारात सध्या T+1 सेटलमेंट पद्धत लागू आहे. याचा अर्थ असा की ऑर्डरच्या अंमलबजावणीच्या 24 तासांच्या आत शेअर्स आणि रोख रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. (BSE to launch beta version of T+0 settlement next week. Check date other details)
सर्व गुंतवणूकदार T+0 सेटलमेंट सायकलमध्ये सहभागी होण्यास पात्र असतील. T+0 सायकलमध्ये ट्रेडिंग 9.15 ते 1.30 वाजेपर्यंत असेल. T+0 सेटलमेंटच्या पहिल्या टप्प्यात त्याच दिवशी सेटलमेंट लागू केले जाईल, त्यानंतर शेअर खरेदीदारांना त्याच दिवशी शेअर (शेअर्स त्यांच्या डीमॅट खात्यात पोहोचतील) मिळेल आणि विक्रेत्यांना त्याच दिवशी पैसे मिळतील.
जर तुम्ही दुपारी 1:30 पर्यंत शेअर्सची खरेदी किंवा विक्री केली तर त्यांचे सेटलमेंट संध्याकाळी 4:30 पर्यंत होईल. सध्या, बाजार भांडवलाच्या दृष्टीने टॉप-500 लिस्टेड कंपन्यांमध्ये ट्रेडिंगसाठी T+0 सेटलमेंट सिस्टम लागू होईल.
पूर्वी T+5 सेटलमेंट सिस्टम होती - भारतात 2002 पर्यंत T+5 सेटलमेंट सिस्टम होती. SEBI ने 2002 मध्ये T+3 सेटलमेंट लागू केले. T+2 सेटलमेंट वर्ष 2003 मध्ये लागू करण्यात आली. 2021 नंतर T+1 सिस्टम सुरू करण्यात आली.
जानवारी 2023 मध्ये त्याची अंमलबजावणी झाली. त्यामुळे 24 तासांत फंड आणि शेअर्सचे सेटलमेंट होऊ लागले. SEBI च्या मते, T+0 सेटलमेंट सिस्टम जानेवारी 2025 पर्यंत पूर्णपणे तयार होईल.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.