Share Market Today: आज अर्थसंकल्पाच्या दिवशी कसा असेल शेअर बाजार? कोणते शेअर्स असतील तेजीत?

Share Market Investment Tips (Top Shares): सोमवारी अस्थिर व्यापार सत्रात भारतीय बेंचमार्क इंडेक्स किरकोळ घसरणीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 79.43 अंकांनी अर्थात 0.10 टक्क्यांनी घसरून 80,525.22 वर बंद झाला
Share Market Investment Tips
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Investment Tips: सोमवारी अस्थिर व्यापार सत्रात भारतीय बेंचमार्क इंडेक्स किरकोळ घसरणीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 79.43 अंकांनी अर्थात 0.10 टक्क्यांनी घसरून 80,525.22 वर बंद झाला आणि निफ्टी 21.60 अंकांनी म्हणजेच 0.09 टक्क्यांनी घसरून 24,509.30 वर बंद झाला. बीएसई मिडकॅप इंडेक्स 1.3 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्स 0.8 टक्क्यांनी वधारला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

ओव्हरसोल्ड परिस्थिती असूनही, आरएसआयमधील बुलिश डायव्हर्जंसमुळे इंडेक्समध्ये लक्षणीय घसरण झाली नाही असे प्रोग्रेसिव शेअर्सचे आदित्य गग्गर म्हणाले. बाजारात सोमवारी संमिश्र वातावरण दिसून आले. मिड आणि स्मॉलकॅपमध्ये तेजी दिसली, तर निफ्टी 21.65 अंकांनी किंचित घसरून 24,509.25 वर बंद झाला.

ऑटो आणि फार्मा सेक्टर्समध्ये 1 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आणि त्यांनी ऑऊटपरफॉर्म केले. तर रिॲल्टी सर्वात जास्त घसरला. आज अर्थात 23 जुलैला केंद्रीय अर्थसंकल्पाचा दबाव पाहता दोन्ही बाजूंनी चढ-उतार अपेक्षित आहेत. निफ्टीला 24,200 वर सपोर्ट दिसत आहे. तर वरच्या स्तरावर 24,800 वर रझिस्टंस आहे.

सोमवारी अर्थात 22 जुलैला सुरुवातीच्या कमजोरीतून बाहेर आल्यानंतर निफ्टीने डोजीसारखा पॅटर्न तयार केला, पण तरीही तो शेवटी थोड्या घसरणीसह बंद झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी यांनी सांगितले.

आज अर्थसंकल्प असल्याने इंट्राडेमध्ये अस्थिरता असण्याची शक्यता आहे. निफ्टीला शॉर्ट टर्ममध्ये 24661 वर आणि नंतर 24801 वर रझिस्टंसचा सामना करावा लागू शकतो. तर एखादेवेळी घसरण झाल्यास 24141 वर सपोर्ट मिळू शकतो.

Share Market Investment Tips
share Investment and Tax: शेअरमध्ये गुंतवणुक करताय? त्यावरील कर आकारणीची गणितं माहिती आहेत का?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • विप्रो (WIPRO)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • आयटीसी (ITC)

  • एसबीआय लाइफ (SBILIFE)

  • पॉलीकॅब (POLYCAB)

  • एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी (HDFCAMC)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • पेज इंडिया (PAGEIND)

Share Market Investment Tips
Economic Survey: आता दरवर्षी द्यावा लागणार लाखो लोकांना रोजगार तरच..., आर्थिक सर्वेक्षणात महत्त्वाची माहिती समोर

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.