Budget 2024: गुंतवणुकीची मोठी संधी! बजेटदरम्यान 'या' मोदी स्टॉकवर ठेवा लक्ष; ब्रोकरेजने दिला मोलाचा सल्ला

Budget 2024 Share Market: केंद्रीय अर्थसंकल्प 2024 सादर होण्याच्या एक दिवस आधी शेअर बाजारात चढ-उतार सुरू आहे. व्यवहाराच्या सुरुवातीला घसरण झाल्यानंतर बाजाराने चांगली रिकव्हरी केली. विश्लेषकांचे म्हणणे आहे की संरक्षण क्षेत्रातील स्वदेशीकरणावर भर दिला जाईल
Budget 2024
Budget 2024 Share MarketSakal
Updated on

Budget Btocks: केंद्रीय अर्थसंकल्प 2024 सादर होण्याच्या एक दिवस आधी शेअर बाजारात चढ-उतार सुरू आहे. व्यवहाराच्या सुरुवातीला घसरण झाल्यानंतर बाजाराने चांगली रिकव्हरी केली. शेअर बाजाराच्या मागील रेकॉर्डवर नजर टाकल्यास, बाजार बजेटच्या आसपास आणि येत्या आठवड्यात चांगला परतावा देऊ शकतो. बजेटमध्ये पायाभूत सुविधा, कॅपेक्स आणि उत्पादनाशी संबंधित क्षेत्रावंर लक्ष केंद्रित असेल. या क्षेत्रातील शेअर्सना मोदी स्टॉक्स म्हणले जातात.

अर्थसंकल्पाच्या दिवसांत सेन्सेक्सच्या 10 वर्षांच्या कामगिरीचे विश्लेषण केल्यास, शेअर बाजार सरासरी 0.27% वाढला आहे. हेलिओस कॅपिटलचे समीर अरोरा म्हणाले, धोरणांमध्ये सातत्य राहण्याचे चांगले संकेत असल्याने त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन जेव्हा अर्थसंकल्प सादर करतील तेव्हा कोणत्या शेअर्सवर लक्ष ठेवालं?

संरक्षण शेअर्स

विश्लेषकांचे म्हणणे आहे की संरक्षण क्षेत्रातील स्वदेशीकरणावर भर दिला जाईल आणि धोरणात्मक गरजा आणि आधुनिकीकरणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अंतरिम अर्थसंकल्पाच्या तुलनेत यात जास्त वाढ होऊ शकते.

प्रभुदास लीलाधरचे अमनीश अग्रवाल म्हणाले, "आम्हाला विमान, इंजिन आणि वाहनांसाठी जास्त वाटप अपेक्षित आहे. संरक्षण मंत्रालय निर्यातीवरही लक्ष देईल, आर्थिक वर्ष 29 पर्यंत 50,000 कोटी रुपयांचे संरक्षण निर्यात लक्ष्य जाहीर केले आहे, जे FY24 मध्ये 21,100 कोटी रुपये होते.

Budget 2024
ITR Filing on WhatsApp: आता व्हॉट्सॲपवरूनही आयटीआर भरता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

शेअरखानने HAL, BEL आणि भारत फोर्ज या शेअर्सवर लक्ष ठेवा असे सांगितले आहे, तर प्रभुदासला अपेक्षा आहे की HAL, BEML, BEL, MDL, BDL, GRSE, डेटा पॅटर्न, कोचीन शिपयार्ड आणि इतर खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या संरक्षण शेअर्समध्ये उत्साह कायम राहील .

चॉईस ब्रोकिंगने BEL, BDL आणि HAL ची निवड केली आहे. आधुनिकीकरण, सुरक्षितता तसेच समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरला गती देण्यावर लक्ष केंद्रित करून अंतिम अर्थसंकल्पात रेल्वेसाठीची तरतूद आणखी वाढण्याची अपेक्षा रेल्वे स्टॉक विश्लेषकांनी केली आहे.

पायाभूत सुविधा क्षेत्रातील शेअर्स

नोमुराला विश्वास आहे की सार्वजनिक भांडवली खर्चावर लक्ष केंद्रित करणे हा सरकारच्या आर्थिक धोरणाचा मुख्य भाग असेल. परिणामी, अंतरिम अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या जीडीपीच्या 3.4% वरून सरकार आपला एकूण भांडवली खर्च GDP च्या 3.5% पर्यंत वाढवेल अशी आमची अपेक्षा आहे. ब्रोकरेजने सांगितले की या शेअर्सवर लक्ष ठेवा - अल्ट्राटेक, एल अँड टी, पीएनसी इन्फ्राटेक.

Budget 2024
WazirX: चोरीचा शोध लावा आणि करोडपती व्हा; 'या' कंपनीने दिली 200 कोटींची ऑफर

पॉवर शेअर्स

ऊर्जा हा अर्थसंकल्पातील प्रमुख विषय असेल, ज्यामध्ये सौर, पवन, जलविद्युत, अणुऊर्जा इत्यादी क्षेत्रांमध्ये क्षमता सतत वाढवली जाईल, जेणेकरून 2030 पर्यंत 500 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमतेचे उद्दिष्ट गाठता येईल. ऊर्जा क्षेत्रात एनटीपीसी, पॉवर ग्रीड, कोल इंडिया, टाटा पॉवर, सीईएससी यांच्या शेअर्सवर लक्ष ठेवा असे प्रभुदास यांनी सांगितले.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.