Budget 2024: बजेटनंतर संरक्षण क्षेत्रातील शेअर्स तेजीत राहणार का? एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा

Budget 2024 Expectations Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै 2024 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
Budget 2024
Budget 2024 defence stocksSakal
Updated on

Budget 2024 Expectations Share Market: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै 2024 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातून शेअर बाजारालाही अनेक संकेत मिळू शकतात. अशा स्थितीत संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी येईल का, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

संरक्षण क्षेत्रातील शेअर्सवर नजर टाकली तर गेल्या एका महिन्यात त्यात प्रचंड वाढ झाली आहे. यातील काही शेअर्स 90 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. संरक्षण क्षेत्राच्या स्वदेशीकरणाला सरकारने दिलेले प्रोत्साहन हे त्यामागचे एक कारण आहे.

नौदलाच्या युद्धनौका बनवणारी सरकारी संरक्षण कंपनी GRSE च्या शेअर्सने गेल्या एका महिन्यात 90% परतावा दिला आहे. तर माझगाव डॉक शेअर्सचा परतावा 73% आहे. त्याचप्रमाणे पारस डिफेन्सने गेल्या एका महिन्यात 63%, कोचीन शिपयार्डने 49% आणि भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडने 28 % परतावा दिला आहे.

गुंतवणूकदारांनी 1 लाख कोटींहून अधिक कमावले

गेल्या एका महिन्यात देशातील आघाडीच्या 10 संरक्षण कंपन्यांच्या परताव्यावर नजर टाकली तर त्यांच्या एकूण बाजार भांडवलात 1 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. याचा अर्थ या शेअर्सच्या सर्व गुंतवणूकदारांची एकूण संपत्ती इतकी वाढली आहे.

Budget 2024
Budget 2024: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना अर्थसंकल्पात मिळू शकते ‘गुड न्यूज’; करात दिलासा मिळणार का?

'आत्मनिर्भर भारत'वर सरकारचा भर

कोविड काळात निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी भारत सरकारने 'आत्मनिर्भर भारत' वर भर देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे देशांतर्गत संरक्षण कंपन्यांना चांगल्या ऑर्डर मिळाल्या आहेत.

हिंदुस्तान एरोनॉटिक्सपासून ते कोचीन शिपयार्डपर्यंत त्यांच्याकडे इतक्या ऑर्डर्स आहेत की ते पूर्ण होण्यास खूप वेळ लागेल, यावेळीही सरकार 'आत्मनिर्भर भारत'वर लक्ष केंद्रित करेल, कारण रोजगारनिर्मिती यावेळी मोठे आव्हान आहे. त्याच वेळी, सरकारने देशाच्या विविध भागांमध्ये संरक्षण कॉरिडॉर योजनांची रूपरेषा आधीच तयार केली आहे.

Budget 2024
RBI: आरबीआयचा कर्जदारांना दिलासा! नियमात केला मोठा बदल; बँकांना पाठवल्या सूचना

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.