Canara Robeco AMC: कॅनरा बँक आपली म्युच्युअल फंड उपकंपनी कॅनरा रोबेको एएमसी (Canara Robeco AMC) शेअर बाजारात लिस्ट करणार आहे. बँकेने ही माहिती दिली. मात्र, कंपनीचा IPO कधी येणार याबाबत बँकेने काहीही स्पष्ट केलेले नाही.
लिस्टींगबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असेही बँकेने सांगितले. या बातमीनंतर कॅनरा बँकेच्या शेअर्समध्ये 1.61 टक्क्यांची वाढ दिसून आली आणि हा शेअर 432.25 रुपयांवर बंद झाला.
कॅनरा बँकेने आपली म्युच्युअल फंड उपकंपनी कॅनरा रोबेको ऍसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड स्टॉक एक्स्चेंजमध्ये इनिशियल पब्लिक ऑफरिंगद्वारे (IPO) लिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी तत्त्वतः मान्यता दिली आहे.
लिस्ट झाल्यानंतर कॅनरा रोबेको एएमसी ही भारतात लिस्ट होणारी पाचवी म्युच्युअल फंड कंपनी असेल. याआधी एचडीएफसी एएमसी, निप्पॉन लाइफ इंडिया एएमसी, यूटीआय ऍसेट मॅनेजमेंट कंपनी आणि आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिस्ट झाल्या आहेत.
कंपनीची स्थापना 1993 मध्ये कॅनरा बँक म्युच्युअल फंड म्हणून झाली. कॅनरा बँकेने डच ऍसेट रोबेको ग्रुपसोबत भागीदारी केल्यानंतर 2007 मध्ये त्याचे कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड असे नामकरण करण्यात आले. कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड ऍसेट अंडर मॅनेजमेंट नोव्हेंबर 2023 पर्यंत 78,398.51 कोटी आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.