Cello World IPO: घरगुती उत्पादने आणि स्टेशनरी उत्पादक सेलो वर्ल्ड लिमिटेडचा (Cello World Ltd) आयपीओ 30 ऑक्टोबरला खुला होणार आहे. 1,900 कोटीचा हा आयपीओ 1 नोव्हेंबरला बंद होईल. अँकर गुंतवणूकदार 27 ऑक्टोबरला शेअर्ससाठी बोली लावू शकतील.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार, हा आयपीओ प्रमोटर्स आणि इतर शेअरधारकांच्या ऑफर फॉर सेलवर (OFS) आधारित आहे. यामध्ये 10 कोटीचे शेअर्स पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
ओएफएसमध्ये पंकज घिसूलाल राठोड, गौरव प्रदीप राठोड, प्रदीप घिसुलाल राठोड, संगीता प्रदीप राठोड, बबिता पंकज राठोड आणि रुची गौरव राठोड यांच्या इक्विटी शेअर्सची विक्री समाविष्ट आहे.
मुंबईस्थित सेलो वर्ल्डकडे तीन प्रमुख कॅटगरीमध्ये उत्पादन पोर्टफोलिओ आहे. पहिला ग्राहक गृहउपयोगी वस्तू, दुसरा रायटींग इंस्ट्रुमेंट्स आणि तिसरा स्टेशनरी आणि मोल्डेड फर्निचर आणि संबंधित उत्पादने आहेत.
2017 मध्ये, त्यांनी 'सेलो' ब्रँड अंतर्गत काचेच्या वस्तू आणि ओपल वेअर व्यवसायात प्रवेश केला. दमण, हरिद्वार (उत्तराखंड), बद्दी (हिमाचल प्रदेश), चेन्नई (तामिळनाडू) आणि कोलकाता (पश्चिम बंगाल) या पाच ठिकाणी कंपनीचे 13 मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत.
शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट करण्याचाही प्रस्ताव आहे. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझर्स लिमिटेड हे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.