Chandrababu Naidu: एक्झिट पोलचा अंदाज अन् चंद्राबाबू मालामाल, शेअर बाजारातून कमावले 870 कोटी, नेमकं काय घडलं?

हेरिटेज फूड्सच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी भुवनेश्वरी यांच्या संपत्तीत गेल्या 5 दिवसांत 579 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
Chandrababu Naidu
Chandrababu Naiduesakal

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून देशाच्या राजकारणात दोन नेते सर्वात जास्त चर्चेत आहेत. एक नितीश कुमार आणि दुसरे  तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष चंद्राबाबू नायडू. या दोन नेत्यांवर आता एनडीए सरकारची मदार असणार आहे. यातील चंद्राबाबू नायडू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबाने गेल्या 5 दिवसांत शेअर बाजारातून सुमारे 870 कोटी रुपये कमावले आहेत.

चंद्राबाबू नायडू यांनी 1992 मध्ये 'हेरिटेज फूड्स' कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी डेअरी उत्पादनांचा व्यवसाय करते. नायडूंच्या विजयानंतर गेल्या 5 दिवसांपासून त्यांचे शेअर्स गगनाला भिडत आहेत. गेल्या 5 दिवसात सुमारे 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एक्झिट पोलने नायडूंच्या तेलुगु देसम पक्षाच्या (टीडीपी) मोठ्या विजयाचा अंदाज वर्तवल्यानंतर दोन दिवसांनी हेरिटेज फूड्सचे शेअर्स 3 जून रोजी 424 रुपयांवर व्यवहार करत होते.

तेव्हापासून हा शेअर सातत्याने वाढत आहे आणि आज शुक्रवारी तो 661.25 रुपयांवर बंद झाला, जो आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर आहे. या वाढीसह हेरिटेज फूड्सचे बाजार भांडवल या आठवड्यात 2,400 कोटी रुपयांनी वाढले आहे. कंपनीचे मार्केट कॅप 7 जून रोजी 6,136 कोटी रुपये झाले, जे एका आठवड्यापूर्वी 3,700 कोटी रुपये होते.

एक्सचेंजवर उपलब्ध माहितीनुसार, चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबाकडे हेरिटेज फूड्समध्ये 35.7 टक्के हिस्सा आहे. त्यांची पत्नी भुवनेश्वरी यांच्याकडे 24.37 टक्के, तर मुलगा लोकेश आणि सून ब्राह्मणी यांच्याकडे अनुक्रमे 10.82 टक्के आणि 0.46 टक्के हिस्सा आहे. नायडू यांचा नातू देवांश यांचा या डेअरी कंपनीत 0.06 टक्के हिस्सा आहे.

Chandrababu Naidu
Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडूंना हवीत सहा मंत्रिपदे;भाजपकडे मागण्यांची यादी सादर,सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू

हेरिटेज फूड्सच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी भुवनेश्वरी यांच्या संपत्तीत गेल्या 5 दिवसांत 579 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर उर्वरित कुटुंबातील सदस्यांच्या संपत्तीत या काळात 291  कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या कालावधीत कुटुंबातील सर्व सदस्यांच्या संपत्तीत 870 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या, ज्यामध्ये टीडीपीने आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. या विजयामुळे चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे पुढचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. नायडू यांच्या पक्षाकडे लोकसभेच्या 16 जागा आहेत आणि आता भाजप सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. यामुळे राष्ट्रीय राजकारणात चंद्राबाबू नायडू यांचा दर्जा लक्षणीयरीत्या वाढला.

(नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.)

Chandrababu Naidu
Lok Sabha Result: वय-25 वर्षे, पद-खासदार... हे आहेत सर्वात तरुण MP, राजकीय धुरंधरांचा केला पराभव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com