Chandrayaan 3: चांद्रयान-3 च्या लँडिंगपूर्वीच 'या' कंपनीच्या शेअरमध्ये झाली 10 टक्के वाढ

Chandrayaan 3 Updates: चांद्रयान 3 तयार करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.
Chandrayaan 3 Updates
Chandrayaan 3 UpdatesSakal
Updated on

Chandrayaan 3 Updates: देशच नाही तर संपूर्ण जगाच्या नजरा भारत आणि चांद्रयान 3 वर आहेत. चांद्रयान 3 तयार करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. भारत सरकारच्या महारत्न कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे.

या कंपनीचे नाव भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) आहे. ज्याच्या शेअर्समध्ये मंगळवारी 10 टक्क्यांहून अधिक तेजी पाहायला मिळाली. ही एक सरकारी कंपनी आहे, जिला महारत्नाचा दर्जा मिळाला आहे. चांद्रयान तयार करण्यात भेलचे मोठे योगदान आहे.

कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

मंगळवारी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अर्थात भेलच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी वाढून 111.05 रुपये प्रति शेअरवर बंद झाला. बीएसईच्या आकडेवारीनुसार, कंपनीचा शेअर केवळ दिवसाचाच नाही तर 52 आठवड्यांचा उच्चांक 112.75 रुपयांवर पोहोचला.

कंपनीचा शेअर सोमवारी 100.85 रुपयांवर बंद झाला आणि मंगळवारी 101.25 रुपयांवर उघडला. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Chandrayaan 3 Updates
Credit Card: क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर सावधान, ही छोटीशी चूक पडू शकते महाग, अशी घ्या काळजी

चालू वर्षात 38 टक्के परतावा दिला

चालू वर्षात भेलच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, चालू वर्षात कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 38 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

गेल्या एका महिन्यात या शेअर्समधून गुंतवणूकदारांची कमाई 13 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. एका वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत आणि 109 टक्के परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांनी अवघ्या एका आठवड्यात सुमारे 10 टक्के कमाई केली आहे.

Chandrayaan 3 Updates
PNB Scam: मेहुल चोक्सीच्या पत्नीची जामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी कोर्टात धाव, काय आहे प्रकरण?

चांद्रयान 3 मध्ये कंपनीचे योगदान

BHEL या महान कंपनीने चांद्रयान 3 मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कंपनीने चांद्रयान 3 साठी बॅटरी आणि इतर घटक उपलब्ध करून दिले होते. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स ही पॉवर प्लांट उपकरण निर्माता कंपनी आहे जी ऊर्जा, उद्योग, वाहतूक, संरक्षण इत्यादी क्षेत्रांसाठी डिझाइन, अभियांत्रिकी, उत्पादन, चाचणी इ. काम करते.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()