Chemical Stock : 'या' केमिकल स्टॉकमध्ये वाढीचे संकेत, तज्ज्ञांना विश्वास...

इक्विटीजच्या मते, सध्याच्या पातळीपासून एसआरएफचे शेअर्स 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. बीएसईवर त्याच्या शेअर्सची किंमत सध्या 2398.80 रुपये आहे.
Chemical Stock
Chemical Stocksakal
Updated on

Chemical Stock : स्पेशालिटी केमिकल सेक्टर तेजीने वाढत आहे. त्यामुळेच या सेक्टरमधील मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवता येऊ शकते. असाच एक स्टॉक म्हणजे एसआरएफ (SRF). या वर्षी त्याचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

बाजारातील तज्ज्ञांना यामध्ये तेजीचा कल दिसत आहे. ब्रोकरेज निर्मल इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या मते, सध्याच्या पातळीपासून एसआरएफचे शेअर्स 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. बीएसईवर त्याच्या शेअर्सची किंमत सध्या 2398.80 रुपये आहे.

एसआरएफ स्पेशालिटी केमिकल्स स्पेसमध्ये मार्केट लीडर म्हणून समोर आली आहे. स्पेशालिटी केमिकल्स सेगमेंट गेल्या पाच वर्षांत पाचपट वाढला आहे. कंपनीचे स्पेशॅलिटी सेगमेंटमध्ये 15 प्लांट आणि 4 मल्टी-प्रॉडक्ट प्रॉडक्शन (MPP) युनिट्स आहेत. कंपनीने गेल्या काही वर्षांत आपला प्रॉडक्ट पोर्टफोलिओ वाढवला आहे.

कंपनीचा आरओसीई अर्थात रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड गेल्या दोन वर्षांत सुधारला आहे. ब्रोकरेजच्या मते, उत्पादन वेगाने वाढवण्याची, त्यांच्या प्रॉडक्ट मिक्समध्ये सुधार करण्याची, शिवाय त्यांच्या प्रॉडक्ट्स उत्पादनांच्या मजबूत मागणीचा फायदा मिळण्याचा विश्वास आहे. याशिवाय, कंपनीने नुकतेच फ्लोरोपॉलिमर्स विभागात प्रवेश केला आहे आणि ब्रोकरेज यावर सकारात्मक आहे.

Chemical Stock
Multibagger Stock Tips: 'या' संरक्षण क्षेत्रातील कंपनीच्या शेअरमुळे गुंतवणूकदारांची झाली चांदी; आणखी तेजीचा अंदाज

एसआरएफचे शेअर्स 10 जुलै 2009 रोजी 20.08 रुपयांना होते. आता ते 2398.80 रुपयांवर आहे म्हणजेच 14 वर्षात एसआरएफमध्ये एक लाखाचे 1.20 कोटी झाले. गेल्या वर्षी 6 जुलै 2022 रोजी तो 2002.50 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता. यानंतर, पुढील दोन महिन्यांत 43 टक्क्यांनी वाढून 14 सप्टेंबर 2022 रोजी 2864.35 रुपयांवर पोहोचला. हा विक्रमी उच्चांक आहे आणि सध्या या उच्चांकावरून 16% सूटवर मिळत आहे.

Chemical Stock
Stock Market : 1 लाखाचे 96 लाख, 6 वर्षात 'या' शेअरची कमाल...

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.