China Economy: शेअर बाजार उघडताच चीनवर मोठे आर्थिक संकट, 5 मिनिटांत कंपनीचे 2,200 कोटी रुपयांचे नुकसान

China Economy: कंपनीचे शेअर पाच मिनिटांत 25 टक्क्यांनी कोसळले.
China Evergrande shares tumble 25 percent after wealth management staff detained
China Evergrande shares tumble 25 percent after wealth management staff detained Sakal
Updated on

China Economy: चीनमधील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी एव्हरग्रँड ग्रुपने स्वतःला दिवाळखोर घोषित केले होते. कंपनीच्या या घोषणेनंतर अमेरिकेत खळबळ उडाली होती. एका बलाढ्य चिनी कंपनीची दिवाळखोरी आर्थिक संकटाची चाहूल देत होती. दिवाळखोर घोषित केल्यानंतर शेअर बाजारातून कंपनीचे व्यवहार बंद झाले होते. जे पुन्हा गेल्या महिन्यातच सुरू झाले.

मात्र, कंपनीच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या घसरणीनंतर परिस्थिती सुधारत असल्याचे दिसून आले. पण सोमवारी हाँगकाँगचा बाजार उघडताच कंपनीचे शेअर पाच मिनिटांत 25 टक्क्यांनी कोसळले. कंपनीच्या गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार सुमारे 2,200 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेअर्समध्ये 25 टक्क्यांची घसरण

प्रत्यक्षात कंपनीच्या मनी मॅनेजमेंट युनिटच्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये 25 टक्क्यांची घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, पोलिसांकडून सुरू असलेल्या नव्या तपासामुळे कंपनीसाठी नव्या अडचणी निर्माण होऊ शकतात.

माहितीनुसार, सकाळच्या व्यापार सत्रात शेअर 25 टक्क्यांनी घसरून 0.465 हाँगकाँग डॉलरवर आला, जी दोन आठवड्यांतील नीचांकी पातळी आहे. आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीचे शेअर्स आज 0.560 हाँगकाँग डॉलरवर उघडले.

5 मिनिटांत 2,200 कोटी रुपयांचे नुकसान

5 मिनिटांत कंपनीचे शेअर 25 रुपयांनी घसरल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय रुपयात पाहिल्यास, कंपनीला तिच्या मार्केट कॅपमधून 2,200 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

गुंतवणूकदारांनी 207 कोटी हाँगकाँग डॉलर गमावले. हाँगकाँग स्टॉक मार्केटमधील कंपनीचे मार्केट कॅप 8.319 अब्ज हाँगकाँग डॉलर्स आहे. तज्ञांच्या मते, कंपनीच्या शेअर्समध्ये येत्या काही दिवसांत घसरण सुरूच राहू शकते.

चीनची अर्थव्यवस्था संकटात?

या कंपनीमुळेच चीनमध्ये रिअल इस्टेटचे संकट सुरू झाले. या कंपनीने 2021 मध्ये कर्जाच्या पेमेंटमध्ये चूक केली होती. याचा परिणाम चीनच्या रिअल इस्टेट क्षेत्रावर झाला आणि तो सध्या गंभीर संकटात आहे. रिअल इस्टेट कंपन्यांच्या थकबाकीमुळे बँकांची अवस्थाही बिकट आहे.

या संकटामुळे चीनची संपूर्ण अर्थव्यवस्था बुडण्याची भीती आहे. याचे कारण चीनने रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. चीनच्या जीडीपीमध्ये बांधकाम क्षेत्राचा वाटा सुमारे 25 टक्के आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.