Share Market: शेअर बाजारातील ऐतिहासिक तेजीबद्दल सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता; सेबीला दिल्या विशेष सूचना

CJI on Share Market Rally: देशांतर्गत शेअर बाजारात सध्या ऐतिहासिक तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या एका महिन्यात सेन्सेक्सने 10 हजार अंकांची जबरदस्त झेप घेतली आहे. या विक्रमी तेजीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांना बऱ्यापैकी कमाई होत असून ते आनंदी आहेत.
CJI
CJI on Share Market RallySakal
Updated on

CJI on Share Market Rally: देशांतर्गत शेअर बाजारात सध्या ऐतिहासिक तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या एका महिन्यात सेन्सेक्सने 10 हजार अंकांची जबरदस्त झेप घेतली आहे. या विक्रमी तेजीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांना बऱ्यापैकी कमाई होत असून ते आनंदी आहेत. मात्र, बाजारातील ही तेजी काहींना घाबरवणारीही आहे.

भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी गुरुवारी शेअर बाजाराच्या या विक्रमी तेजीवर चिंता व्यक्त केली. BSE सेन्सेक्स 80 हजार झाल्याच्या काही बातम्यांचा संदर्भ देत ते म्हणाले की, हीच सावध राहण्याची वेळ आहे. विशेषत: या बाजार तेजीत, बाजार नियामक सेबी आणि सॅट (सिक्युरिटीज अपील न्यायाधिकरण) यांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.

सरन्यायाधीश चंद्रचूड काल SAT च्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन करत होते. त्यावेळी त्यांनी शेअर बाजारातील तेजीवर भाष्य केले. ते म्हणाले- BSE ने 80 हजारांचा टप्पा ओलांडणे हा एक उत्साहवर्धक क्षण आहे, कारण त्यासोबत भारत एका नव्या युगात प्रवेश करत आहे.

CJI
Budget 2024: सरकार आरोग्यावर करतय GDP च्या फक्त 0.28 टक्के खर्च; बजेटमध्ये अर्थमंत्री तरतूद वाढवणार का?

सेबी आणि सॅटची भूमिका वाढवण्यावर भर

सरन्यायाधीशांच्या म्हणण्यानुसार, शेअर बाजार जसजसा वाढत जातो, तसतशी सेबी आणि सॅटची भूमिकाही वाढते असे मला वाटते. माझ्या मते, अशा वातावरणात SEBI आणि SAT या संस्था सावध राहतील. ते बाजाराच्या यशाचा आनंद साजरा करतील, परंतु बाजाराचा कणा मजबूत राहील याचीही खात्री करतील. ते म्हणाले की, देशात स्थिर आणि गुंतवणुकीचे वातावरण निर्माण करण्यासाठी सेबी आणि SAT ची भूमिका महत्त्वाची आहे.

सेन्सेक्सने 80 हजारांचा टप्पा ओलांडला

सरन्यायाधीशांची ही टिप्पणी अशा वेळी आली आहे जेव्हा बीएसई सेन्सेक्सने या आठवड्यात इतिहासात प्रथमच 80 हजार अंकांची पातळी ओलांडली आहे. खरे तर शेअर बाजारातील तेजीवर चिंता व्यक्त होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

CJI
Budget 2024: रिअल इस्टेट क्षेत्राला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा; तज्ज्ञांनी कोणत्या मागण्या केल्या?

सरन्यायाधीश म्हणाले की सिक्युरिटीज अपील न्यायाधिकरण (सॅट) हे एका रेफरीसारखे आहे, जे वित्तीय क्षेत्रातील तीव्र स्पर्धात्मक जगात सर्व भागधारक नियमांचे पालन करतात की नाही याची खात्री करतात. न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की आपली बाजारपेठ आणि व्यवसाय अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत, नवीन नियमांचा पूर आला आहे. त्यामुळे न्यायाधिकरणाने सतत आव्हानांसाठी स्वतःला तयार केले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.