Clinitech Laboratory IPO : क्लिनिटेक लेबोरेटरी लिमिटेडचा आयपीओ खुला, जाणून घ्या प्राईस बँडसह लॉट साईज...

क्लिनिटेक लेबोरेटरी लिमिटेडचा आयपीओ (Clinitech Laboratory IPO) आज अर्थात 25 जुलैला सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे.
Clinitech Laboratory IPO
Clinitech Laboratory IPOSakal
Updated on

क्लिनिटेक लेबोरेटरी लिमिटेडचा आयपीओ (Clinitech Laboratory IPO) आज अर्थात 25 जुलैला सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. या आयपीओमध्ये29 जुलैपर्यंत पैसे गुंतवता येणार आहेत. आयपीओसाठी शेअर्सचे ऍलॉटमेंट 30 जुलैा होईल असं बोलले जात आहे. 31 जुलै रोजी डीमॅट खात्यात शेअर क्रेडिट किंवा रिफंड शक्य आहे.

कंपनीने 1 ऑगस्टला बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर आपले शेअर्स लिस्ट करणे अपेक्षित आहे. क्लिनीटेक लॅबोरेटरी आयपीओ ही एक फिक्स्ड प्राइस इश्यू आहे, ज्याची किंमत प्रति शेअर 96 रुपये निश्चित करण्यात आली आहे. एका अर्जासह किमान लॉट साईज 1200 शेअर्सी आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान गुंतवणूक रक्कम 1 लाख 15 हजार 200 रुपयांची आहे. हा आयपीओ 5.78 कोटीचा आहे.

जगदीश उमाकांत नायक, ज्योती जगदीश नायक आणि आशुतोष जगदीश नायक हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत. तर फर्स्ट ओव्हरसीज कॅपिटल लिमिटेड ही क्लिनीटेक लॅबोरेटरीज आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहे.

1990 मध्ये स्थापित, क्लिनीटेक लॅबोरेटरीज लिमिटेड डायग्नोस्टिक, हेल्थ टेस्टिंग सर्व्हिस प्रदान करते. कंपनी आपल्या केंद्रांमध्ये 150 हून अधिक टेस्ट करते, ज्यामध्ये बायोकेमिकल टेस्ट्स, इम्युनोलॉजी टेस्ट, मॉलिक्यूलर बायोलॉजी टेस्ट, सीरोलॉजी टेस्ट, सेरोलॉजी चाचण्या, मायक्रोबायोलॉजी टेस्ट आणि हिस्टोपॅथॉलॉजी टेस्ट्सचा समावेश आहे.

क्लिनिटेक प्रयोगशाळेत ठाणे आणि नवी मुंबईच्या आसपास आठ डायग्नोस्टिक सेंटर्स आहेत. कंपनी तिच्या NABL अर्थात नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज या मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाच्या उपकरणांनी दरवर्षी 3 लाखांहून अधिक चाचण्या करते. नवी मुंबईतील ऐरोलीजवळील वैद्यकीय चाचणी सुविधा ISO 15189:2012 नुसार NABL (नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज) द्वारे मान्यताप्राप्त आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()