Coca-Cola Company: कोल्ड ड्रिंक निर्माता कंपनी कोका-कोलाने पलक्कड जिल्ह्यातील प्लाचीमाडा येथील 35 एकर जमीन केरळ सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कोका-कोला कंपनीने वाटाघाटीची प्रक्रिया सुरू केली आहे.
सीएमओने दिलेल्या निवेदनानुसार, हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य अधिकारी जुआन पाब्लो रॉड्रिग्ज ट्रोवेटो यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना पत्र पाठवून तेथील मालमत्ता आणि इमारत राज्याच्या ताब्यात देण्याच्या कंपनीच्या निर्णयाची माहिती दिली.
कोका-कोला कंपनीने शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखालील प्रस्तावित शेतकरी उत्पादक संघटनेसाठी (एफपीओ) जमीन सोडण्यासाठी आधीच बोलणी सुरू केली होती.
उर्जा मंत्री के कृष्णनकुट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चेच्या सुरुवातीला कोल्ड ड्रिंक कंपनीने जमीन हस्तांतरित करण्यास सहमती दर्शवली. कंपनीने तेथील शेतकऱ्यांसाठी डेमो फार्म उभारण्यासाठी तांत्रिक मदत देण्याचीही तयारी दर्शवली आहे.
हा प्लांट 2004 मध्ये बंद झाला होता:
स्थानिक लोकांच्या पर्यावरणीय प्रदूषणाच्या तक्रारी आणि कंपनीकडून होत असलेल्या पाण्याच्या गेेरवापराच्या तक्रारीनंतर कोका-कोलाने मार्च 2004 मध्ये प्लाचीमाडा येथील आपले युनिट बंद केले. जेणेकरून तेथील लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
या जमिनीवर सरकारने 1.1 कोटी रुपये खर्च केले आहेत:
कोका-कोलाने केरळ सरकारच्या विनंतीवरून 2021 मध्ये विवादित जमिनीचे कोविड सुविधेत रूपांतर करण्यात आले. कोका-कोलाने आवश्यक दुरुस्तीचे काम पूर्ण करून जमिन सरकारकडे सुपूर्द केली.
त्यानंतर, 2021 मध्ये, केरळ सरकारने पलक्कडमधील कोका-कोला प्लांटचे 550 बेडच्या COVID19 उपचार केंद्रात रूपांतर करण्यासाठी 1.1 कोटी रुपये खर्च केले. ज्यामध्ये 100 ऑक्सिजन बेड, 50 आयसीयू बेड आणि 20 व्हेंटिलेटर सर्वसामान्यांच्या उपचारासाठी तयार करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.