Coca Cola: स्विगी-झोमॅटोला बसणार धक्का! कोका-कोलाची भारतात मोठी गुंतवणूक, फूड मार्केटमध्ये...

भारतातील स्टार्टअपमध्ये कोका-कोलाची ही पहिली गुंतवणूक असणार आहे.
Coca Cola
Coca ColaSakal
Updated on

Coca Cola: कोल्डड्रिंक बनवणारी कंपनी कोका-कोला ऑनलाइन फूड ऑर्डरिंग प्लॅटफॉर्म थ्राईव्हमध्ये भागभांडवल विकत घेणार आहे. थ्राईव्ह हे फूड सर्च आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे ज्यात 5,500 हून अधिक रेस्टॉरंट्ससह भागीदारी आहे.

ही कंपनी थेट स्विगी आणि झोमॅटोशी स्पर्धा करते. भारतातील स्टार्टअपमध्ये कोका-कोलाची ही पहिली गुंतवणूक असेल, परंतु अद्याप त्याच्या डीलबद्दल कोणतीही आकडेवारी मिळालेली नाही.

कंपनीची ही गुंतवणूक कोका-कोला कंपनीला त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा फायदेशीर ठरणार आहे. कारण ते ग्राहकांना फक्त कोका-कोलाचे कोल्डड्रिंक उत्पादने तसेच थ्राईव्ह अॅपवर केलेल्या खाद्यपदार्थांची ऑर्डर देण्यास प्रोत्साहित करतील.

2021 च्या शेवटी, Domino's चे ऑपरेटर ज्युबिलंट फूडवर्क्सनं ने थ्राईव्ह मधील 35% भागभांडवल सुमारे 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले. (Coca-Cola May Invest In India's Online Food Ordering App 'Thrive')

भारतातील कोल्डड्रिंक मार्केटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होत आहे. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंपनीकडून मोठी गुंतवणूक या क्षेत्रात होणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने आधीच अनेक दशके जुना ब्रँड कॅम्पा कोला नवीन अवतारात लॉन्च केला आहे. आता या बाजारपेठेतील जास्तीत जास्त हिस्सा काबीज करण्याची तयारी सुरू आहे.

Coca Cola
Amul vs Nandini: अमूल-नंदिनी वादात राहुल गांधींची एंन्ट्री; ट्विट करत म्हणाले; कर्नाटकची...

स्पर्धेचा परिणाम बाजारात दिसून येत आहे :

रिलायन्स इंडस्ट्रीजने सॉफ्ट ड्रिंक मार्केटमध्ये रिलायन्स जिओच्या यशस्वी फॉर्म्युलाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला आहे.

यासाठी कंपनीने किंमतीच्या बाबतीत आक्रमक धोरण अवलंबले आहे. भारतातील काही बाजारपेठांमध्ये कोका कोला आणि पेप्सी सारख्या कंपन्यांनी किंमतीमध्ये मोठे बदल केले आहेत.

ग्राहकांना रेस्टॉरंट्समधून खाद्यपदार्थ तसेच पेये ऑर्डर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कोका-कोलाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात कोक इज कुकिंग नावाचे जागतिक खाद्य व्यासपीठ लाँच केले होते.

त्यावेळी कोका-कोलाचे उपाध्यक्ष, मार्केटिंग हेड, भारत आणि दक्षिण पश्चिम आशिया, अर्णब रॉय यांनी सांगितले होते की, कंपनीला भारतात खाद्यपदार्थांच्या जोडीने वापर वाढवण्याची मोठी संधी दिसत आहे.

Coca Cola
Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.