Cochin Shipyard च्या शेअर्समध्ये तेजी, नव्या ऑर्डरमुळे होणार आणखी वाढ...

कंपनीला रॉटरडॅमस्थित सॅमस्कीप ग्रुपकडून दोन झीरो-एमिशन फीडर कंटेनर जहाजांसाठी 550 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.
Cochin Shipyard
Cochin Shipyardsakal
Updated on

Cochin Shipyard : कोचीन शिपयार्डच्या (Cochin Shipyard) शेअर्समध्ये सोमवारी 6.5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. कंपनीला रॉटरडॅमस्थित सॅमस्कीप ग्रुपकडून (Rotterdam-based Samskip Group) दोन झीरो-एमिशन फीडर कंटेनर जहाजांसाठी 550 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.

यामुळेच शेअरमध्ये तेजी आली. सोमवारी सकाळी बीएसईवर कंपनीचा शेअर 5 टक्क्यांनी वाढून 466.5 रुपयांवर गेला. (Cochin Shipyard shares are in growth as it gets new order)

कंपनीला NAVSHUTLE 1 AS आणि NAVSHUTLE 2 AS, Lysaker नॉर्वेमधून ऑर्डर मिळाल्या आहेत. दोन झिरो एमिशन फीडर कंटेनर व्हेसल्सच्या डिझाइन आणि बांधकामासाठी ऑर्डर मिळाली आहे.

कंपनीला यानंतर आणखी दोन जहाजांची ऑर्डर मिळू शकते असे कोचीन शिपयार्डने एका एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे. पहिले जहाज 28 महिन्यांत आणि दुसरे जहाज 34 महिन्यांत पूर्ण करायचे आहे.

Cochin Shipyard
Pharma Stock : या फार्मा स्टॉकबाबत एक्सपर्ट सकारात्मक, तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?

जहाजे 45 फूट उंच आणि 365 फूट लांब घन कंटेनर वाहून नेऊ शकतात असे कोचीन शिपयार्डने सांगितले. याचा उपयोग युरोपियन बाजारपेठांमध्ये सेवा देण्यासाठी केला जाईल.

ऑर्डर बुकमधील बहुतेक मोठ्या करारांची अंमलबजावणी आर्थिक वर्ष 2024 पासून होऊ शकते असा विश्वास विश्लेषकांना आहे. भारतीय नौदल आणि इतर आंतरराष्ट्रीय ग्राहकांकडून पुढील दोन ते तीन वर्षांत ऑर्डर आणि प्रोजेक्ट्सची मजबूत पाइपलाइन दिसत आहे.

Cochin Shipyard
Gabriel India Shares : गॅब्रिएल इंडियाचे शेअर्स देतील दमदार परतावा, तज्ज्ञांना विश्वास...

यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढ होईल अशी आशा आहे. गेल्या तीन महिन्यांत हा स्टॉक 25 टक्क्यांनी घसरला आहे. पण मागच्या तीन वर्षांचा विचार केल्यास 73 टक्के वाढ दिसून आली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.