Concord Biotech IPO: लिस्टिंगच्या दिवशीच गुंतवणूकदार झाले मालामाल! झुनझुनवालांचा ही कंपनीत आहे मोठा हिस्सा

Concord Biotech IPO: मार्च 2023 च्या आर्थिक वर्षात कंपनीने 888 कोटी रुपयांची कमाई केली होती
Concord Biotech IPO
Concord Biotech IPOSakal
Updated on

Concord Biotech IPO: रिसर्च बायोफार्म कॉनकॉर्ड बायोटेकच्या शेअर्सनी BSE आणि NSE वर चांगली सुरुवात केली आहे. कंपनीचे शेअर्स 900.05 रुपयांवर सूचीबद्ध झाले आहेत. या IPO मधील इश्यू किंमत रु. 741 प्रति शेअर होती, जी सूचीबद्ध होताच रु. 900 पेक्षा जास्त किंमतीवर पोहोचली.

याचा अर्थ गुंतवणूकदारांना प्रति शेअर 21.46 टक्के प्रीमियम मिळाला. कॉन्कॉर्ड बायोटेकला प्रति शेअर 159 रुपये नफा झाला आहे.

Concord Biotech IPO
Petrol Price: पेट्रोल होणार स्वस्त, निवडणुकीच्या तोंडावर महागाई रोखण्यासाठी मोदींची 1 लाख कोटी रुपयांची योजना तयार

गुंतवणूकदारांना किती नफा?

कॉन्कॉर्ड बायोटेकचे शेअर्स BSE अंतर्गत रु. 923 च्या उच्च पातळीवर व्यवहार करत होते, तर त्याची लिस्टींग प्रति शेअर रु 900 वर होती. त्याच वेळी, या IPO ची इश्यू किंमत प्रति शेअर 741 रुपये आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना प्रति शेअर 182 रुपये नफा झाला आहे.

मार्च 2023 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 888 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याच वेळी, कंपनीला याच कालावधीत 240 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

Concord Biotech IPO
RBI Guidelines: आरबीआयने कर्ज खात्यातील दंडाबाबत बँकांना दिल्या सूचना, केला मोठा बदल

IPO ला कसा प्रतिसाद मिळाला?

कॉन्कॉर्ड बायोटेकचा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलद्वारे जाहीर केला होता. या अंतर्गत, किंमत 705 ते 741 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती.

हा आयपीओ 8 ऑगस्टपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. यामध्ये गुंतवणूकदारांना किमान 14,820 रुपये गुंतवायचे होते. त्याच वेळी किरकोळ गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवावे लागले.

Concord Biotech IPO
Nirmala Sitharaman Birthday: लंडनमधील सेल्सवुमन ते देशाच्या अर्थमंत्री असा आहे निर्मला सीतारामन यांचा प्रवास

राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक

स्टॉक मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची कंपनी असलेल्या अॅसेट मॅनेजमेंट रेअर एंटरप्रायझेसने या कंपनीत एकूण 24.09 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. त्यांच्या कंपनीने 2004 पासून या फर्ममध्ये गुंतवणूक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.