Dividend Stocks: गुंतवणूकदारांची दिवाळी! सरकारी कंपनीने लाभांश केला जाहीर

Dividend Stocks: गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअरमध्ये 13 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
container corporation of india dividend Navratna PSU Stock Declares Rs 3 per Share Dividend
container corporation of india dividend Navratna PSU Stock Declares Rs 3 per Share Dividend Sakal
Updated on

Dividend Stocks: सरकारी कंपनी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (कॉन्कोर) च्या शेअर्समध्ये शुक्रवारी 5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. कंपनीच्या शेअर्समधील ही वाढ तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर दिसून आली आहे. या सरकारी कंपनीने या आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी लाभांश जाहीर केला आहे.

निव्वळ नफ्यात वाढ

कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने शेअर बाजारांना माहिती दिली की चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत महसूल 2,194 कोटी रुपये झाला आहे. जो गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 11 टक्के अधिक आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा निव्वळ नफा 21 टक्क्यांनी वाढून 367 कोटी रुपये झाला आहे.

container corporation of india dividend Navratna PSU Stock Declares Rs 3 per Share Dividend
Share Market: शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताय, थोडं थांबा हे वाचा! 2024 च्या लोकसभेचा....

कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने स्टॉक एक्सचेंजला कळवले की पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 3 रुपये दराने अंतरिम लाभांश दिला जाईल.

याचा अर्थ, पात्र गुंतवणूकदारांना 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या स्टॉकवर 60 टक्के नफा मिळेल. कंपनीने लाभांशासाठी 16 नोव्हेंबर 2023 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.

container corporation of india dividend Navratna PSU Stock Declares Rs 3 per Share Dividend
Mukesh Ambani Threat: मुकेश अंबानींना धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक

शेअर बाजारात कंपनीची कामगिरी

शुक्रवारी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 5 टक्क्यांहून अधिक वाढीसह 716.90 रुपयांवर बंद झाले. गेल्या 6 महिन्यांत, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीत 13 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.