Denta Water IPO: डेंटा वॉटर अँड इन्फ्रा सोल्युशन्स लवकरच आणणार आयपीओ, सेबीकडे पेपर्स दाखल

Denta Water IPO: कंपनीकडून 75 लाख फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील.
Denta Water and Infra Solutions files DRHP with SEBI to raise funds via IPO
Denta Water and Infra Solutions files DRHP with SEBI to raise funds via IPO Sakal
Updated on

Denta Water IPO: बंगळुरूस्थित डेंटा वॉटर अँड इन्फ्रा सोल्युशन्स लवकरच आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. कंपनीने यासाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केले आहेत. आयपीओ अंतर्गत, कंपनीकडून 75 लाख फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. ऑफर फॉर सेल म्हणजेच ओएफएस अंतर्गत कोणतीही विक्री होणार नाही.

वॉटर इंजिनिअरिंग, प्रोक्योरमेंट आणि कंस्ट्रक्शन (EPC) सर्व्हिसेज देणारी कंपनी डेंटा वॉटर तिच्या खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी 150 कोटीचा निधी वापरेल. त्यापैकी 50 कोटी चालू आर्थिक वर्षात तर उर्वरित 100 कोटी पुढील आर्थिक वर्षात खर्च केले जाणार आहेत.

याशिवाय, सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठीही पैसे खर्च केले जातील. एसएमी कॅपिटल्स ही या आयपीओसाठी बुक-रनिंग लीड मॅनेजर आहे.

Denta Water and Infra Solutions files DRHP with SEBI to raise funds via IPO
Maharashtra GDP: भारताच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा; गुजरात, उत्तर प्रदेशचा वाटा किती?

ग्राउंड वॉटर रीचार्जिंग प्रोजेक्ट्समध्ये काम करणाऱ्या वॉटर अँड इन्फ्रॉस्ट्रक्चर कंपनीने ऑक्टोबर 2023 पर्यंत वॉटर मॅनेजमेंट इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित 27 प्रोजेक्ट्स पूर्ण केले आहेत.

ऑक्टोबर 2023 पर्यंत 22 प्रोजेक्ट्स चालू आहेत, ज्याची एकूण काँन्ट्रॅक्ट व्हॅल्यू 984.23 कोटी असल्याचे कंपनीने सांगितले. यापैकी 976.7 कोटी वॉटर मॅनेजमेंट प्रोजेक्ट्ससाठी आणि 7.54 कोटी रेल्वे आणि रस्ते यासह इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रोजेक्ट्ससाठी आहेत.

Denta Water and Infra Solutions files DRHP with SEBI to raise funds via IPO
Maharashtra GDP: भारताच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा; गुजरात, उत्तर प्रदेशचा वाटा किती?

मार्च 2023 मध्ये कंपनीने 50.1 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे, जो मागील वर्षी 38.3 कोटी होता. याच कालावधीत ऑपरेशन्समधील महसूल 119.6 कोटींवरून 174.3 कोटी इतका वाढला आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.