Diwali 2023 Muhurat Trading: दिवाळीच्या मुहूर्तावर सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या वाढीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 354.77 अंकांच्या किंवा 0.55 टक्क्यांच्या वाढीसह 65,259.45 च्यावर बंद झाला. तर निफ्टी 100.20 अंकांच्या किंवा 0.52 टक्क्यांच्या वाढीसह 19,525.55 च्या वर बंद झाला.
बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1.14 टक्क्यांच्या वाढीसह 38,816.08 च्या पातळीवर बंद झाला. तर मिडकॅप निर्देशांक 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 32,783.34 च्या पातळीवर बंद झाला.
सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीसह बंद झाले. बीएसई ऑटो इंडेक्स 0.51 टक्के, रियल्टी इंडेक्स 0.59 टक्के, मेटल इंडेक्स 0.86 टक्के, आयटी इंडेक्स 0.96 टक्के, बीएसई एनर्जी इंडेक्स 0.85 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
आज बाजार कसा होता?
दिवाळीच्या मुहूर्तावर सेन्सेक्स-निफ्टी सत्राची सुरुवात तेजीसह झाली आणि संपूर्ण सत्रात बाजार तेजीत राहिला. आजच्या व्यवहारात सर्व क्षेत्रिय निर्देशांक वाढीसह बंद झाले. मात्र, सर्वच क्षेत्रांची वाढ एक टक्क्यांहून कमी झाली आहे.
आयटी आणि मीडिया क्षेत्रातील निर्देशांक मुहूर्त सत्रात सुमारे 0.7 टक्क्यांनी वाढून बंद झाले. बँकिंग क्षेत्र निर्देशांक 0.4 टक्के, वाहन क्षेत्र निर्देशांक 0.55 टक्के, वित्तीय सेवा क्षेत्र निर्देशांक 0.44 टक्के, एफएमसीजी क्षेत्र निर्देशांक 0.35 टक्के, धातू क्षेत्र निर्देशांक 0.65 टक्के, फार्मा क्षेत्र निर्देशांक 0.3 टक्के, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खासगी बँकांचा निर्देशांक 0.38 टक्के, रियल्टी. क्षेत्र निर्देशांक 0.61 टक्के, आरोग्य सेवा क्षेत्र निर्देशांक 0.24 टक्के, ग्राहक टिकाऊ वस्तू 0.68 टक्के आणि तेल आणि गॅस क्षेत्र निर्देशांक 0.54 टक्क्यांनी वाढला आहे.
आज लहान शेअर्समध्ये अधिक वाढ झाली आहे. निफ्टीमध्ये अर्ध्या टक्के वाढीच्या तुलनेत मिडकॅप 50 ने 0.67 टक्के आणि स्मॉलकॅप 50 ने 0.91 टक्के वाढ नोंदवली.
कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ?
मुहूर्ताच्या व्यवहारात बीएसईच्या शेअरने वर्षातील नवीन उच्चांक गाठला. मुहूर्ताच्या सत्रात स्टॉकने सुमारे 8 टक्क्यांच्या वाढीसह 2168.5 या वर्षातील नवीन सर्वोच्च पातळी गाठली आहे. याशिवाय आजच्या व्यवहारात मार्क्सन्स फार्मानेही वर्षातील नवीन सर्वोच्च पातळी गाठली. ट्रेडिंग दरम्यान, स्टॉक 6.5 टक्क्यांनी वाढून 138.85 च्या स्तरावर पोहोचला.
त्याचबरोबर कोल इंडियाचा शेअर वाढला. सत्रादरम्यान, स्टॉकने 323 च्या आधीच्या बंद पातळीच्या तुलनेत 336.8 या दिवसातील सर्वोच्च पातळी गाठली, म्हणजेच मुहूर्त ट्रेडिंगमध्ये स्टॉकमध्ये 4 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
मुहूर्त सत्रात बीएसई आणि मार्क्सन्स फार्मासह 269 शेअर्सनी वर्षातील सर्वोच्च पातळी गाठली आहे. दुसरीकडे, 21 शेअर्सनी वर्षातील नीचांकी पातळी गाठली. आकडेवारीनुसार, 401 शेअर्सवर अपर सर्किट लागू करण्यात आले आहे.
127 शेअर्समध्ये लोअर सर्किट लावण्यात आले आहे. म्हणजेच मुहूर्त ट्रेडिंगमध्ये 670 शेअर्समध्ये विक्रमी वाढ झाली आहे. आज BSE वर 2899 शेअर्स वधारून बंद झाले तर 696 शेअर्स घसरणीसह बंद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.