DRC Systems India Ltd Bonus Share: कम्प्यूटर, सॉफ्टवेअर आणि कंसल्टिंग डीआरसी सिस्टम्स इंडिया लिमिटेडने (DRC Systems India Ltd) आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअरची भेट दिली आहे. या आयटी कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेटही निश्चित केली आहे.
याशिवाय कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकालही जाहीर केलेत. बोनस शेअर्सच्या रेकॉर्ड डेटच्या घोषणेनंतर, डीआरसी सिस्टम्स इंडियाचे शेअर्स सलग दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये 2 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर पोहोचले. गेल्या एका वर्षात हा शेअर 32 टक्क्यांनी वाढला आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा 224.5% ने वाढून 5.10 कोटी झाल्याची माहिती कंपनीने एक्सचेंजला दिली. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नफा 1.48 कोटी होता. तिमाही आधारावर, कंपनीचा महसूल 37 टक्क्यांनी वाढून 13.56 कोटी झाला आहे.
236.67 कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या डीआरसी सिस्टम्सने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स भेट दिले आहेत. एक्सचेंज फायलिंगनुसार, कंपनीच्या बोर्डाने 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स मंजूर केले आहेत. म्हणजेच त्याच्या गुंतवणूकदारांना 1 शेअरसाठी 2 बोनस शेअर्स मिळतील. यासाठी 27 फेब्रुवारी 2024 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.
2012 मध्ये स्थापन झालेल्या डीआरसी सिस्टम्स इंडियाचे मुख्यालय गुजरातमध्ये आहे. ते मोबाइल ऍप डेव्हलपमेंट, वेबसाइट डेव्हलपमेंट, एआय आणि ऑटोमेशन, एंटरप्राइझ सोल्यूशन्स आणि क्लाउड-आधारित सेवांसह संपूर्ण आयटी सोल्यूशन्स ऑफर करतात. कंपनी भारत आणि इतर देशांतील ग्राहकांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आउटसोर्सिंग सेवाही देते.
या शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगला नफा दिला आहे. हा स्टॉक 5 दिवसांत 3 टक्के, एका महिन्यात 30 टक्के आणि 6 महिन्यांत 43 टक्के वाढला आहे. या वर्षी आतापर्यंत स्टॉक 24 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. एका वर्षात तो 32 टक्क्यांनी वाढलाय. या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 69.50 रुपये आणि निचांक 27.55 रुपये आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.