Entero Healthcare Solutions IPO Check GMP and key details before subscribing
Entero Healthcare Solutions IPO Check GMP and key details before subscribingSakal

IPO News: एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्सचा आयपीओ आज होणार खुला, काय आहे प्राइस बँड?

Entero Healthcare Solutions IPO: हरियाणास्थित कंपनी एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्स (Entero Healthcare) आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. कंपनीने यासाठी 1195-1258 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित केला आहे. आयपीओच्या माध्यमातून 1,600 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.
Published on

Entero Healthcare Solutions IPO: हरियाणास्थित कंपनी एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्स (Entero Healthcare) आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. कंपनीने यासाठी 1195-1258 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित केला आहे. आयपीओच्या माध्यमातून 1,600 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. हा आयपीओ 9 फेब्रुवारीला सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि 13 फेब्रुवारीला बंद होईल.

हेल्थकेअर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूट कंपनी एंटेरो हेल्थकेअर 1000 कोटींचे नवीन इक्विटी शेअर जारी करेल. याशिवाय 600 कोटीचे शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) विकले जातील.

कॉर्पोरेट प्रमोटर ऑर्बीमेड एशिया III मॉरिशस ओएफएसमध्ये 38.15 लाख शेअर्ससह सर्वात जास्त विक्री होणारा शेअरहोल्डर असेल. यूएस-आधारित हेल्थकेअर फोकस्ड गुंतवणूक फर्म ऑर्बीमेडची एंटेरोमध्ये 57.27 टक्के हिस्सेदारी आहे.

इंडिविजुअल प्रमोटर प्रभात अग्रवाल आणि प्रेम सेठी हे ओएफएसमध्ये 4.7 लाख आणि 3.13 लाख इक्विटी शेअर्स विकतील, तर उर्वरित 16 शेअरहोल्डर्सच्या एकूण 47.69 लाख शेअर्सपैकी 1.7 लाख शेअर्स विकले जातील.

एन्टरो हेल्थकेअर सोल्युशन्सने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 8 कोटीचे शेअर्स राखीव ठेवले आहेत, ज्यांना अंतिम ऑफर किंमतीवर प्रति शेअर 119 रुपयांच्या सवलतीने हे शेअर्स मिळतील. नेट ऑफरच्या 75% पर्यंत क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल इनवेस्टर्ससाठी, 15 टक्के हाय नेटवर्थ इंडिविजुअल असलेल्या व्यक्तींसाठी आणि उर्वरित 10 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

Entero Healthcare Solutions IPO Check GMP and key details before subscribing
SIP Investment: ‘एसआयपी’ने नोंदविले नवे विक्रम; जानेवारी महिन्यात गुंतवणुकीसह खात्यांची संख्याही सर्वोच्च

गुंतवणूकदार किमान 11 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 11 शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. अशा प्रकारे, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 11 शेअर्ससाठी मिनिमम ऍप्लिकेशन साइज 13,838 रुपये असेल.

कंपनी 14 फेब्रुवारीपर्यंत यशस्वी गुंतवणूकदारांना शेअर्स वाटप करेल. हे शेअर्स 15 फेब्रुवारीपर्यंत पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील.

एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्सची सुरुवात प्रभात अग्रवाल आणि प्रेम सेठी यांनी केली आहे. कंपनीने फार्मसी, हॉस्पिटल आणि क्लिनिक सेगमेंट्समधील अनेक ग्राहकांसाठी देशभरात 77 इंटीग्रेटेड हेल्थकेयर प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूशन प्लेटफॉर्म तयार केला आहे. कंपनी कर्जाची परतफेड करण्यासाठी आयपीओ फंडचे 142.5 कोटी आणि लॉन्ग टर्म वर्किंग कॅपिटलसाठी 480 कोटी खर्च करेल.

Entero Healthcare Solutions IPO Check GMP and key details before subscribing
Yes Bank: एक डील अन् गुंतवणूकदार झाले मालामाल! येस बँकेच्या शेअर्समध्ये 3 दिवसांत 40 टक्क्यांची वाढ

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.