Upcoming IPO: तुम्हालाही IPO मधून कमाई करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही महिन्यांत IPO मधून गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला आहे. पुढील 6 महिन्यांत 28 कंपन्यांचे IPO येणार आहेत.
आता पुढील 6 महिन्यांत 38,000 कोटी रुपये उभारण्यासाठी हॉटेल कंपन्यांसह 28 कंपन्या IPO लाँच करण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही IPO खरेदी करून कमाई करू शकता. कोणत्या कंपन्यांचा IPO पुढील 6 महिन्यांत येणार आहे?
28 कंपन्यांनी IPO मधून 38 हजार कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा आहे. पीटीआयने एका अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, याशिवाय 41 कंपन्या सेबीच्या मंजुरीची वाट पाहत आहेत.
'या' कंपन्यांचे आयपीओ येणार
आयपीओ आणण्याच्या तयारीत असणाऱ्या कंपन्यांच्या यादीत Oyo, Tata Technologies, JNK India, Dome Industries, Epack Durables, BLS e-Services, India Shelter Finance Corporation, Cello World, RK Swami, Flair Writing यांचा समावेश आहे. तसेत गो डिजिट इन्शुरन्स सारख्या मोठ्या कंपन्या शेअर बाजारात उतरणार आहेत.
निवडणुकीपूर्वी अनेक आयपीओ लॉन्च होणार
पीटीआयच्या वृत्तानुसार, प्राइम डेटाबेसचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव हल्दिया यांनी सांगितले की, भारतीय शेअर बाजारात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या एकूण कंपन्यांपैकी तीन नवीन तंत्रज्ञान कंपन्या एकत्रितपणे 12 हजार कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत. येत्या काही महिन्यांत सार्वत्रिक निवडणुकांमुळे अनेक आयपीओ लॉन्च होण्याची शक्यता आहे.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.