Small Cap Stock: 'या' स्मॉलकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, कोणते आहेत हे शेअर्स?

Small Cap Stock: शेअर बाजाराने नुकताच त्याचा नवा सार्वकालिक उच्चांक अर्थात ऑल टाइम हाय गाठला. मार्केटचा अंडरटोन मजबूत आहे. या वातावरणात सेठी फिनमार्टचे विकास सेठी यांनी गुंतवणुकदारांसाठी काही शेअर्स सिलेक्ट केले आहे, जे त्यांना दमदार परतावा देऊ शकतात.
Expert Advice on Investing in these Smallcap Shares, Which Are These Shares
Expert Advice on Investing in these Smallcap Shares, Which Are These Shares Sakal
Updated on

Small Cap Stock: शेअर बाजाराने नुकताच त्याचा नवा सार्वकालिक उच्चांक अर्थात ऑल टाइम हाय गाठला. मार्केटचा अंडरटोन मजबूत आहे. या वातावरणात सेठी फिनमार्टचे विकास सेठी यांनी गुंतवणुकदारांसाठी काही शेअर्स सिलेक्ट केले आहे, जे त्यांना दमदार परतावा देऊ शकतात.

सेठींनी आपल्या गुंतवणुकदारांसाठी कॅश मार्केटमधून रॉसेल इंडिया (Rossell India) आणि बीएलएस इंटरनॅशनलची (BLS) निवड केली आहे.

रोसेल इंडियाचे शेअर्स सध्या 476 रुपयांवर ट्रेड करत आहेत. सेठी यांनी या शेअरसाठी शॉर्ट टर्म टार्गेट 500 रुपये आणि स्टॉपलॉस 450 रुपये ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

ही कंपनी इंजिनिअरिंग सर्व्हिसेजमध्ये आहे आणि त्याशिवाय चहा-कॉफीचा बिझनेसही करते. आसाममध्ये कंपनीचे 7 टी-स्टेट्स आहेत. शिवाय ही कंपनी इंजिनिअरिंगमध्ये एअरोस्पेस आणि डिफेंस कॅटर करते. कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत आहेत.

Expert Advice on Investing in these Smallcap Shares, Which Are These Shares
Bank Holidays: नवीन वर्षात किती दिवस बँका राहणार बंद? पाहा संपूर्ण यादी

विकास सेठींची दुसरी निवड बीएलएस इंटरनॅशनलची केली आहे. हा शेअर सध्या 310 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्यांनी यासाठी शॉर्ट टर्म टारगेट 330 रुपये आणि स्टॉपलॉस 298 रुपयांवर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. ही कंपनी व्हिसा सर्व्हिसेसमध्ये आहे.

कंपनी ई-गव्हर्नन्स सेक्टरमध्येही एन्ट्री करणार आहे, आणि त्यासाठी कंपनीने अनेक राज्य सरकारांशी करार केले आहेत. या आठवड्यात या शेअरमध्ये 1.5 टक्के वाढ दिसून आली तर त्यांनी एका महिन्यात सुमारे 17 टक्के परतावा दिला आहे.

Expert Advice on Investing in these Smallcap Shares, Which Are These Shares
Reliance Disney: डिस्नेसोबत अंबानींचा करार! रिलायन्स बनणार मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.