Fed Reserve: फेड 23 वर्षांचा इतिहास बदलणार का? भारतीय शेअर बाजारात होणार उलथापालथ; RBIच्या भूमिकेकडे लक्ष

Federal Reserves Rate Cut Decision: अमेरिकेची केंद्रीय बँक, यूएस फेडरल रिझर्व्हची दोन दिवसीय बैठक मंगळवारपासून सुरू होत आहे. सध्या, जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील व्याजदर 23 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहेत.
Federal Reserves Rate Cut Decision
Federal Reserves Rate Cut DecisionSakal
Updated on

Federal Reserves Rate Cut Decision: अमेरिकेची केंद्रीय बँक यूएस फेडरल रिझर्व्हची दोन दिवसीय बैठक मंगळवारपासून सुरू होत आहे. सध्या, जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील व्याजदर 23 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहेत. फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या (FOMC) निर्णयाचा परिणाम भारतासह जगभरातील शेअर बाजारांवर होणार आहे. सध्या, फेडचे दर 5.5 टक्क्यांवर आहेत, जे 23 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहेत.

भारतीय शेअर बाजार गुंतवणूकदारांची पहिली पसंती

FOMC अधिकाऱ्यांनी नुकतेच सूचित केले की ते व्याजदरात कपात करू शकतात. असे झाले तर आधीच नवीन विक्रमी पातळीवर बंद होत असलेल्या भारतीय शेअर बाजाराला आणखी तेजी मिळू शकते.

खरेतर, फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात करणे म्हणजे अमेरिकेतील सरकारी रोख्यांवर व्याजदर कमी करणे. यामुळे, गुंतवणूकदार त्यांचे पैसे बाँडमध्ये गुंतवण्याऐवजी स्टॉक मार्केटमध्ये थोडी अधिक जोखीम घेण्यास प्राधान्य देतील. सध्या भारतीय शेअर बाजार ही गुंतवणूकदारांची पहिली पसंती आहे.

Federal Reserves Rate Cut Decision
Windfall Tax Explainer: मोदी सरकारने विंडफॉल टॅक्स आणला शून्यावर; पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी होणार?

सेन्सेक्स आणि निफ्टी उच्चांकावर

युरोपियन सेंट्रल बँकेने धोरणात्मक व्याजदरात 0.25 टक्क्यांनी कपात केल्यानंतर, भारतीय शेअर बाजारात अशीच वाढ दिसून येत आहे. मंगळवारी BSE सेन्सेक्स 90.88 अंकांच्या वाढीसह 83,079.66 अंकांवर बंद झाला.

व्यवहारादरम्यान, सेन्सेक्सनेही 83,184.34 अंकांच्या सार्वकालिक उच्चांक गाठला. तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी देखील व्यवहारादरम्यान 25,441.65 अंकांवर पोहोचल्यानंतर 34.80 अंकांच्या वाढीसह 25,418.55 अंकांवर बंद झाला.

Federal Reserves Rate Cut Decision
Rich Indians: भारतात करोडपतींच्या संख्येत मोठी वाढ; 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या 31,800वर, एवढा पैसा येतो कुठून?

FPI ने भारतीय बाजारपेठेत 2,22,533 कोटी रुपयांची गुंतवणूक

फेडने व्याजदरात कपात केल्यास विदेशी गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठेत त्यांची गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत FPIs ने भारतीय भांडवली बाजारात 2,22,533 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

फेडरल रिझर्व्हची दोन दिवसीय बैठक बुधवारी संपत आहे. फेडच्या निर्णयाचा परिणाम गुरुवारी भारतीय बाजारात दिसून येईल. व्याजदर किती कमी होतात हे पाहणे बाकी आहे. जर फेडने प्रत्यक्षात दर कमी केले, तर ऑक्टोबरमध्ये व्याजदर कपात करण्यासाठी आरबीआयवरही दबाव येईल, ज्याची बाजार दीर्घकाळापासून मागणी करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.