SIP Investment : 20 वर्षात पाच हजारांची एसआयपी काय कमाल करते ते जाणून घ्या...

सध्याच्या काळात म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानला जातो. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एसआयपी आणि लंपसम अशा दोन्ही प्रकारे करता येते. ज्यांना एकरकमी रक्कम गुंतवायची नाही त्यांच्यासाठी एसआयपी हा एक चांगला पर्याय आहे.
SIP Investment
SIP Investment sakal
Updated on

सध्याच्या काळात म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानला जातो. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एसआयपी आणि लंपसम अशा दोन्ही प्रकारे करता येते. ज्यांना एकरकमी रक्कम गुंतवायची नाही त्यांच्यासाठी एसआयपी हा एक चांगला पर्याय आहे. याद्वारे दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवता येते. तज्ज्ञांच्या मते, म्युच्युअल फंड मार्केट लिंक्ड असूनही त्यातील सरासरी रिटर्न 12 टक्के आहे. यात तुम्हाला चक्रवाढीचा लाभही मिळतो.

एसआयपी अशी गुंतवणूक आहे जी महागाईवर मात करू शकते आणि भविष्यासाठी एक चांगला फंड तयार करू शकते. जर तुम्ही निवृत्तीचा विचार करत असाल आणि त्यासाठी एसआयरी सुरू करू इच्छित असाल, तर त्यात 10% टॉप-अप ठेवा. एसआयपीमध्ये टॉप-अप 10 टक्के लागू करून तुम्ही 20 वर्षांच्या एसआयपीद्वारे जमा केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम जोडू शकता.

जर तुम्ही 5000 रुपयांची नियमित एसआयपी 20 वर्षांसाठी चालू ठेवणार असाल, तर तुम्ही त्यात एकूण 12 लाखाची गुंतवणूक कराल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही 12 टक्के रिटर्ननुसार कॅलक्युलेट केले तर तुम्हाला 37 लाख 95 हजार 740 रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला 20 वर्षांमध्ये एकूण 49 लाख 95 हजार 740 रुपये मिळतील.

SIP Investment
Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

पण जर तुम्ही 5000 रुपयांची एसआयपी सुरू केली आणि ती दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढवली, तर तुम्ही 20 वर्षांत सुमारे 1 कोटीचा निधी जमा करू शकता. टॉप-अप एसआयपी ही एक अशी सुविधा आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या नियमित एसआयपीमध्ये आणखी काही रक्कम जोडू शकता. तुमच्या नोकरीच्या सुरुवातीला तुम्ही 2,000 रुपये मासिक एसआयपीचा पर्याय निवडला आहे. पण तुमचा पगार दरवर्षी वाढतो, मग तुम्ही त्या प्रमाणात दरवर्षी एसआयपीमध्ये काही रक्कम टॉप अप करू शकता.

तुम्ही एका वर्षासाठी 2,000 रुपयांची एसआयपी सुरू केली आणि वर्ष संपल्यानंतर तुम्ही 2,000 रुपयांच्या 10% म्हणजेच 200 रुपयांची वाढ केली आणि ही एसआयपी रुपये 2,200 केली. पुढच्या वर्षी तुम्ही 2,220 रुपयांच्या 10% म्हणजेच 222 रुपये वाढवून ही एसआयपी 2,422 रुपयांची केली. अशा प्रकारे, दरवर्षी तुम्हाला या एसआयपीची मासिक रक्कम 10 टक्क्यांनी वाढवावी लागेल. तुम्ही एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास आणि वार्षिक 10 टक्के टॉप-अप केल्यास, 20 वर्षांत तुम्ही एकूण 34 लाख 36 हजार 500 रुपये गुंतवाल. पण यावर व्याज 65 लाख 7 हजार 858 रुपये असेल. अशा परिस्थितीत, 20 वर्षांमध्ये तुमच्याकडे 99 लाख 44 हजार 358 रुपये म्हणजेच सुमारे 1 कोटी रुपये असतील.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.