जेनसोल इंजीनिअरिंग लिमिटेडच्या (Gensol Engineering Limited) शेअर्सवर सध्या चांगला फोकस दिसून येत आहे. राजस्थान आणि महाराष्ट्रात दोन नवीन सौर प्रकल्प उभारण्यासाठी 337 कोटीच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. या ऑर्डर्समध्ये डिझाइन, इंजिनिअरिंग, खरेदी, बांधकाम आणि कमिशनिंग सेवांचा समावेश असल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली. पहिली ऑर्डर राजस्थानमधील 250 MWac/350 MWdc ISTS (इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टम) सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आहे, तर दुसरी ऑर्डर महाराष्ट्रात 50 MWac/72.5 MWdc सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आहे. या प्रकल्पांची एकूण किंमत अंदाजे 337 कोटी आहे.
हे प्रकल्प साध्य करणे ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे, जी आमच्या ऑपरेशनल क्षमता आणि प्रोजेक्ट स्केलमध्ये मोठा विस्तार दर्शवते असे जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेडचे (EPC बिझनेस) सीईओ अली इम्रान नक्वी म्हणाले. राजस्थान आणि महाराष्ट्रातील हे इपीसी प्रकल्प आमच्या वाढत्या क्षमता आणि महत्त्वाच्या ग्रोथ क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्याचा धोरणात्मक हेतू दर्शवत असल्याचे ते म्हणाले.
जेनसोल इंजिनिअरिंगला दोन नवीन प्रकल्प मिळण्याच्या घोषणेचा स्टॉकवर फारसा परिणाम झाला नाही. 26 फेब्रुवारी रोजी बीएसईवर शेअर 1247.40 रुपयांच्या वाढीसह उघडला. दिवसभरात तो मागील बंद किमतीच्या तुलनेत 4 टक्क्यांनी वाढून 1264 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. व्यवहाराच्या शेवटी, शेअर 1 टक्क्यांच्या वाढीसह 1238.10 रुपयांवर स्थिरावला. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,377.10 आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 265.42 आहे. शेअरचा उच्चांक 1,338.95 रुपये आहे आणि नीचांक 1,095.55 रुपये आहे. सर्किट लिमिट 10 टक्के आहे. गेल्या एका वर्षात जेनसोल इंजिनिअरिंगचे शेअर्स 302 टक्क्यांनी वाढले आहेत.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.