Godrej Consumer Products Ltd : गोदरेज कन्‍झ्युमर प्रॉडक्ट्स

कंपनीने जाहीर केलेल्या ‘पूर्व तिमाही निकाल अपडेट’नुसार पार्क ॲव्हेन्यू आणि कामसूत्र ब्रँड चांगली कामगिरी करत आहेत
Godrej Consumer Products Ltd
Godrej Consumer Products Ltd Sakal
Updated on

गोदरेज कन्‍झ्युमर प्रॉडक्ट्स लि. ही कंपनी हिट, गुड नाईट, गोदरेज नंबर १ साबण, सिंथॉल, गोदरेज एक्स्पर्ट हेअर कलर, नूपुर मेहंदी, एअर फ्रेशनर, गोदरेज प्रोटेक्ट हॅंडवॉश आदी अनेक ग्राहकोपयोगी उत्पादनांची निर्मिती आणि वितरण करते.

हिंदुस्थान युनिलिव्हर लि. या कंपनीत कार्यकारी संचालक आणि उपाध्यक्ष पदावर यशस्वीरीत्या काम करणारे सुधीर सीतापती ऑक्टोबर २०२१ पासून या कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. व्यवसायवृद्धीसाठी कंपनीने एप्रिल २०२३ मध्ये रेमंड कन्झ्युमर केअर लि. (आरसीसीएल) विकत घेतली. यामुळे पार्क ॲव्हेन्यू, केएस, कामसूत्र आदी ब्रँड कंपनीकडे आले आहेत. त्यांची ग्रामीण भागातही चांगली विक्री होत आहे.

कंपनीने जाहीर केलेल्या ‘पूर्व तिमाही निकाल अपडेट’नुसार पार्क ॲव्हेन्यू आणि कामसूत्र ब्रँड चांगली कामगिरी करत आहेत; तसेच पूर्ण वर्षाची व्यवसायवृद्धीची महत्त्वाकांक्षा साध्य करण्याच्या मार्गावर आहेत.

कंपनीसाठी इंडोनेशियातील व्यवसाय भारतानंतरची दुसरी सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. कंपनीचा इंडोनेशियातील व्यवसाय आकर्षक कामगिरी करत आहे, तर कंपनीच्या आफ्रिका, यूएसए आणि मध्य पूर्व व्यवसायात सौम्य घट झाली आहे.

अर्जेंटिनाचे चलन ‘पेसो’च्या तीव्र अवमूल्यनामुळे कंपनीच्या लॅटिन अमेरिकेतील महसुलावर परिणाम झाला आहे. मात्र, भारतातील विक्री सुधारण्याच्या दिशेने चांगली प्रगती होत आहे. व्यवसायवृद्धीसाठी नव्या विकत घेतलेल्या कंपन्यांवर व्यवस्थापनाचा विश्वास आहे; तसेच भारतीय व्यवसायातील संधी ओळखून गुंतवणूक करण्यावर भर देण्याचे धोरण आखण्यात आले आहे.

दीर्घावधीच्या आलेखानुसार, २०१८ पासून या कंपनीच्या शेअरने मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविले आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात १,१३८ रुपये या पातळीच्यावर भाव देऊन दीर्घावधीसाठी आलेखानुसारदेखील तेजीचे संकेत दिले आहेत. शेअर बाजारातील चढ-उतार; तसेच कंपनीच्या कार्यक्षेत्रातील धोका लक्षात घेऊन या शेअरमध्ये दीर्घावधीच्या दृष्टीने मर्यादित प्रमाणात गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(डिस्क्लेमर ः या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.