Upcoming IPO: कंपनी IPO मधून उभारणार 500 कोटी; सेबीकडे कागदपत्रे सादर, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Gold Plus Glass Industry IPO: गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्री लिमिटेडने (Gold Plus Glass Industry) आयपीओसाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर जमा केले आहेत. कंपनी आयपीओअंतर्गत 500 कोटीपर्यंतचे नवीन शेअर्स जारी करेल.
Gold Plus Glass Industry files draft papers with SEBI to launch IPO
Gold Plus Glass Industry files draft papers with SEBI to launch IPOSakal
Updated on

Gold Plus Glass Industry IPO: गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्री लिमिटेडने (Gold Plus Glass Industry) आयपीओसाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर जमा केले आहेत. कंपनी आयपीओअंतर्गत 500 कोटीपर्यंतचे नवीन शेअर्स जारी करेल. याशिवाय, प्रमोटर्स आणि विद्यमान शेअरहोल्डर्सकडून 1.56 कोटी शेअर्सची विक्री (OFS) ऑफर असेल.

गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्री लिमिटेड ही भारतातील दुसरी सर्वात मोठी फ्लोट ग्लास उत्पादक कंपनी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत फ्लोट ग्लास उत्पादन क्षमतेमध्ये कंपनीचा वाटा 22 टक्के होता. (Gold Plus Glass Industry files draft papers with SEBI to launch IPO)

गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्री ऑटोमोटिव्ह, कंस्ट्रक्शन, इंडस्ट्रिअल अशा अनेक सेक्टर्सना उत्पादनांचा पुरवठा करते. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या (DRHP) मसुद्यानुसार, ओएफएसमध्ये शेअर्स विकणाऱ्यांमध्ये सुरेश त्यागी, जिमी त्यागी, पीआय अपॉर्च्युनिटीज फंड-I आणि कोटक स्पेशल सिच्युएशन फंड यांचा समावेश आहे.

गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्री 100 कोटीच्या प्री-आयपीओ प्लेसमेंटचाही विचार करू शकते. असे झाल्यास आयपीओचा आकार कमी होईल. कंपनी कर्जाची परतफेड करण्यासाठी आयपीओमध्ये नवीन शेअर्स जारी करून मिळालेल्या 400 कोटीचा वापर करेल.

Gold Plus Glass Industry files draft papers with SEBI to launch IPO
Sebi: गुंतवणूकदारांची होतेय फसवणूक? IPO आणण्यासाठी कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन; काय आहे प्रकरण?

त्यातील काही भाग कंपनीच्या सामान्य कामकाजासाठी वापरला जाईल. कंपनीच्या प्रोडक्ट पोर्टफोलिओमध्ये क्लियर ग्लास, 28 प्रकारची वॅल्यू ऍडेड ग्लास प्रॉडक्ट्स आणि 11 प्रकारची प्रोसेस्ड ग्लास प्रॉडक्ट समाविष्ट आहेत.

कंपनीने एप्रिल 2022 मध्ये सेबीकडे आयपीओसाठी मसुदा कागदपत्रे सादर केली होती. सेबीनेही आयपीओसाठी मान्यता दिली होती पण कंपनीला एका वर्षाच्या निर्धारित कालावधीत आयपीओ सुरू करता आला नाही. आयआयएफएल सिक्युरिटीज, ॲक्सिस कॅपिटल, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, एसबीय कॅपिटल मार्केट्स हे आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

Gold Plus Glass Industry files draft papers with SEBI to launch IPO
Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणुकीचे आहेत अनेक फायदे; मुलीच्या जन्मानंतर तात्काळ करा सुरु

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()