Grasim Industries: ग्रासिम इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 12 टक्के सवलतीसह गुंतवणूक करण्याची संधी

Grasim Industries: आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज (Grasim Industries) राइट्स इश्यू आणणार आहे. या इश्यूसाठी शेअर्सची किंमत निश्चित करण्यात आली आहे. ग्रासिम इंडस्ट्रीजच्या या इश्यूला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मंजुरी देण्यात आली होती
Grasim to issue rights shares at Rs 1,812 per share
Grasim to issue rights shares at Rs 1,812 per shareSakal
Updated on

Grasim Industries: आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज (Grasim Industries) राइट्स इश्यू आणणार आहे. या इश्यूसाठी शेअर्सची किंमत निश्चित करण्यात आली आहे. ग्रासिम इंडस्ट्रीजच्या या इश्यूला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मंजुरी देण्यात आली होती आणि आता प्रति शेअर किंमत 1812 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

हे शेअर्स सध्याच्या किंमतीपेक्षा 12 टक्क्यांहून अधिक डिस्काउंटवर आहेत. सध्या हे शेअर्स 2068.60 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

कंपनीने 4 हजार कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या सध्याच्या भांडवली खर्चाचे नियोजन करण्यासाठी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी हा निधी उभा केला जात आहे. या इश्यू अंतर्गत कंपनी 2,20,73,935 राइट्स इक्विटी शेअर्स जारी करेल.

जेव्हा एखाद्या कंपनीला निधी उभारण्याची आवश्यकता असते तेव्हा ती तिच्या विद्यमान भागधारकांना राइट्स इश्यू स्वरूपात शेअर्स किंवा कन्वर्टिबल शेअर्स जारी करू शकते.

ग्रासिमने या इश्यूसाठी 179 शेअर्ससाठी 6 शेअर्सचे गुणोत्तर निश्चित केले आहे. त्याची रेकॉर्ड डेट 10 जानेवारी आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा इश्यू 17 जानेवारीला उघडेल आणि 29 जानेवारीला बंद होईल.

Grasim to issue rights shares at Rs 1,812 per share
SEBI: फंड मॅनेजर आणि ट्रस्टींवर सेबीची मोठी कारवाई; ठोठावला 1 कोटीं दंड, काय आहे प्रकरण?

जे शेअरहोल्डर्स राइट्स इश्यू अंतर्गत पात्र आहेत, म्हणजेच त्यांच्याकडे या इश्यूमध्ये सहभागी होण्यासाठी रेकॉर्ड तारखेला शेअर्स आहेत, त्यांना अर्जासोबत पार्टली पेड शेअर्ससाठी 453 रुपये द्यावे लागतील.

यानंतर, उर्वरित पैसे म्हणजेच 1359 रुपये मार्च 2026 पर्यंत किंवा त्यापूर्वी भरावे लागतील. राइट्स इश्यूनंतर, ग्रामिसच्या आउटस्टँडिंग शेअर्सची संख्या 68,06,13,006 पर्यंत वाढेल.

ग्रासिमचे शेअर्स गेल्या वर्षी बीएसईवर 16 मार्च 2023 रोजी 1,528.00 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होते. या पातळीपासून, 10 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत ते 42 टक्क्यांहून अधिक वाढले आणि या वर्षाच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2024 रोजी ते 2,175.55 रुपयांवर पोहोचले, जो शेअरचा विक्रमी उच्चांक आहे.

Grasim to issue rights shares at Rs 1,812 per share
Narayana Murthy: सुधा यांना कंपनीबाहेर ठेवणे ही माझी चूकच; नारायण मूर्ती यांची मुलाखतीदरम्यान कबुली

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com