Multibagger Stock: 19 रुपयांच्या शेअरने केले मालामाल! आता कंपनी देणार 1 शेअरमागे 100 रुपयांचा डिव्हिडेंड

Hawkins Cooker Ltd share price: जुलै 2004 मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत सुमारे 19 रुपये होती
Multibagger Stock Update
Multibagger Stock UpdateSakal
Updated on

Hawkins Cooker Ltd Share Price: प्रेशर कुकर बनवणारी भारतीय कंपनी हॉकिन्स कुकर (Hawkins Cooker) आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के डिव्हिडेंड देणार आहे. कंपनीचे शेअर्स पुढील आठवड्यात एक्स-डिव्हिडंड ट्रेड करतील.

हॉकिन्स ही सर्वाधिक डिव्हिडेंड देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. शिवाय हा एक मल्टीबॅगर स्टॉक आहे, ज्याने कमी वेळेत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा दिला आहे. गेल्या दोन दशकात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 34,000% चा दमदार परतावा दिला आहे.

अनेक गुंतवणूकदार डिव्हिडेंड असणाऱ्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा फायदा असा आहे की शेअर्स वाढल्यावर तुम्हाला नफा तर मिळतोच, पण डिव्हिडंडद्वारे तुम्ही आणखी नफा मिळवू शकता. जर शेअर्स पडले तर अशा परिस्थितीत होणारा तोटा डिव्हिडेंडने भरून काढता येतो.

रेग्युलेटरी फायलिंगनुसार हॉकिन्स कुकर्सने 2022-23 या आर्थिक वर्षात 10 रुपयांची फेस व्हॅल्यू असणाऱ्या प्रति इक्विटी शेअरवर 100 रुपये डिव्हिडेंड देण्याची शिफारस केली आहे.

Multibagger Stock Update
Tata Technologies IPO: 20 वर्षानंतर येतोय टाटा कंपनीचा IPO, तारीख आणि किंमतीसह सर्व माहिती एका क्लिकवर

शिवाय एजीएममध्ये मंजूरी मिळाल्यास, 2 ऑगस्ट 2023 रोजी कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये ज्यांची नावे असतील अशा भागधारकांना डिव्हिडेंड दिला जाईल.

डिव्हिडेंडसाठी 2 ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. या दिवशी एक्स-डिव्हिडंड ट्रेडही आहे. 8 सप्टेंबर 2023 पर्यंत हा डिव्हिडेंड दिला जाईल. या शेअरने गेल्या 20 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 34000% चा बंपर नफा दिला आहे.

Multibagger Stock Update
Jagsonpal Pharmaceuticals : जगसनपाल फार्मास्युटिकल्स

जुलै 2004 मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत सुमारे 19 रुपये होती, जी आता 6,670 रुपये झाली आहे. म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांच्या पैशांमध्ये सुमारे 351 पटीने वाढ झाली आहे.

Multibagger Stock Update
निवड दमदार शेअरची

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com