Share Market History: वडाच्या झाडाखाली बसायचे, 5 जणांनी मिळून असा सुरू केला मुंबईचा शेअर बाजार

Share Market History: आज जगातील टॉप-5 शेअर मार्केटमध्ये भारतीय शेअर बाजाराचा समावेश आहे. देशातील शेअर बाजार हा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई या नावाने ओळखला जातो. बीएसई हा केवळ भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज आहे.
Share Market
Share Market HistorySakal
Updated on

Share Market History: आज जगातील टॉप-5 शेअर मार्केटमध्ये भारतीय शेअर बाजाराचा समावेश आहे. देशातील शेअर बाजार हा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई या नावाने ओळखला जातो. बीएसई हा केवळ भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज आहे. 148 वर्षांपूर्वी 9 जुलै 1875 रोजी मुंबई शेअर बाजार सुरू झाला होता.

बीएसईच्या स्थापनेनंतर शेअर बाजाराने अनेक मोठे विक्रम केले आहेत. अवघ्या 5 जणांनी मिळून त्याची स्थापना केली होती. आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे मार्केट कॅपिटलायझेशनच्या दृष्टीने जगातील 11वे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज बनले आहे.

CNBC TV 18 च्या वृत्तानुसार, 148 वर्षांपूर्वी 9 जुलै 1875 रोजी बीएसईने दक्षिण मुंबईतील टाऊन हॉलजवळ काम सुरू केले आणि अनेक वर्षे येथे काम सुरू होते. 1980 मध्ये, त्याचे कार्यालय पीजे टॉवर्समध्ये स्थलांतरित झाले.

प्रेमचंद पहिले बिग बुल

बीएसईच्या स्थापनेचे श्रेय कॉटन किंग किंवा बिग बुल प्रेमचंद रॉयचंद जैन यांना जाते, त्यांचा इतिहास 1855 मध्ये सुरू होतो, जेव्हा स्टॉक ब्रोकर्स टाऊन हॉलजवळ एका वडाच्या झाडाखाली जमायचे आणि झाडाखाली बसून कापसाचा व्यापार करायचे.

ब्रोकर्सची संख्या सतत वाढत असल्याने त्याचे नाव दलाल स्ट्रीट झाले. 1875 मध्ये BSE ने दलाल स्ट्रीट येथे कायमस्वरूपी काम सुरू केले.

9 जुलै 1875 रोजी दलालांनी नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली. ऑगस्ट 1957 मध्ये, बीएसई हे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन कायद्याअंतर्गत भारत सरकारने मान्यता दिलेले पहिले स्टॉक एक्सचेंज बनले.

बॉम्बे ग्रीन्स
बॉम्बे ग्रीन्सSakal

असा प्रसिद्ध झाला दलाल स्ट्रीट

मुंबईतील मीडोज स्ट्रीट आणि एमजी रोड जंक्शनवरही हे दलाल जमू लागले. ही जागा हळूहळू दलाल स्ट्रीट म्हणून प्रसिद्ध झाली. ब्रोकर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली आणि 1975 मध्ये नेटिव्ह शेअर आणि स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन अस्तित्वात आली.

अधिकृत स्टॉक एक्स्चेंजची ही सुरुवात मानली जाते, जी आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखली जाते. त्यावेळी 1 रु प्रवेश शुल्क घेऊन ही संघटना स्थापन केली होती.

गुंतवणूकदारांची संख्या 11 कोटींच्या पुढे

भारतीय अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सची महत्त्वाची भूमिका आहे. बाजारा विविध क्षेत्रातील 30 मोठ्या कंपन्यांचे शेअर्स मॅनेज करण्याचे काम करतो.

याशिवाय बीएसईमध्ये 5,000 हून अधिक कंपन्या नोंदणीकृत आहेत. जर्मनी-आधारित ड्यूश बोर्स आणि सिंगापूर एक्सचेंज बीएसईचे स्ट्रेटेजिक पार्टनर म्हणून जोडले गेले आहेत.

त्यांच्या गुंतवणूकदारांची संख्या आता 11 कोटींच्या पुढे गेली आहे. तर शेअर बाजाराच्या आकारानुसार भारतीय शेअर बाजार हा जगातील पाचव्या क्रमांकाचा बाजार आहे.

मुंबईतला कापसाचा व्यापार
मुंबईतला कापसाचा व्यापारSakal
Share Market
बँकेत खाते नसताना रामदेव बाबांना 'पतंजली'साठी कर्ज आणि बेट गिफ्ट देणाऱ्या सुनीता पोद्दार आहेत तरी कोण?

BSE चे मार्केट कॅप 292 लाख कोटी

बीएसईच्या आकडेवारीनुसार, एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 292.12 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. यापूर्वी, 1 डिसेंबर 2022 रोजी बीएसईचा सर्वात जास्त मार्केट कॅप 291.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचला होता.

विविध क्षेत्रातील अनेक कंपन्या BSE वर सूचीबद्ध आहेत. यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे.

1990 मध्ये प्रथमच S&P BSE सेन्सेक्स 1000 अंकांवर होता पण आज तो 63,244 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. या 33 वर्षांत बीएसई सेन्सेक्सने 60 हून अधिक वेळा तेजी घेतली आहे.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) हा देखील भारताचे मुख्य स्टॉक एक्सचेंज आहे. हा 1990 मध्ये म्युच्युअल इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज म्हणून स्थापित केला गेला होता.

Share Market
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.