Home First Finance Company India Ltd : होम फर्स्ट फायनान्स कंपनी (शुक्रवारचा बंद भाव : रु. १,०३६)

कंपनीचे शाखांचे जाळे १३ राज्यांमधील १२५ जिल्ह्यांमध्ये पसरले आहे.
Home First Finance Company India Ltd
Home First Finance Company India LtdSakal
Updated on

Home First Finance Company India Ltd : होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लि. (होम फर्स्ट) ही देशातील एक गृहकर्ज पुरवठा करणारी कंपनी आहे. तिची स्थापना तीन फेब्रुवारी २०१० रोजी झाली आणि तीन फेब्रुवारी २०२१ रोजी तिची शेअर बाजारात नोंदणी झाली.

कंपनी प्रामुख्याने अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील प्रथमच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कर्जपुरवठा करण्यावर लक्ष केंद्रित करते. केवळ ४८ तासांच्या मंजुरी प्रक्रियेसह कर्जपुरवठा कला जातो. कंपनीचे शाखांचे जाळे १३ राज्यांमधील १२५ जिल्ह्यांमध्ये पसरले आहे.

सुमारे २९५ टच पॉइंट्ससह १२० शाखा असून, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडूमधील शहरी क्षेत्रांमध्ये लक्षणीय उपस्थिती आहे. कंपनी नव्या शाखा उघडून व्यवसायवृद्धी करत आहे. कर्जांच्या अर्जांवर प्रक्रिया करणे,

ग्राहक अनुभव व्यवस्थापित करणे, जोखीम व्यवस्थापन आदी व्यवसायाच्या विविध पैलूंमध्ये तंत्रज्ञानाचा लाभ घेत कंपनी व्यवसायवृद्धी करत आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ३० सप्टेंबर २०२३ अखेर ८,३६५ कोटी रुपये आहे.

जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार, कंपनीने ७२ कोटी रुपये नफा कमविला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर सुमारे ३७ टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीचे परतावा गुणोत्तर तेजीचा कल दर्शवत आहे.

या कंपनीच्या शेअरने दीर्घावधीच्या आलेखानुसार डिसेंबर २०२१ पासून मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार केल्यावर गेल्या आठवड्यात १,००४ रुपये या अडथळा पातळीच्यावर १,०३६ रुपयांवर बंद भाव देऊन आलेखानुसार ‘ब्रेक आऊट’ देत तेजीचा कल दर्शविला आहे. शेअर बाजारातील चढ-उतार; तसेच कंपनीच्या कार्यक्षेत्रातील जोखीम लक्षात घेऊन या शेअरमध्ये दीर्घावधीच्या दृष्टीने मर्यादित प्रमाणात गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.