SEBI Update: शेअर बाजार नियामक सेबीने धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी मंगळवारी सांगितले की, शेअर बाजाराच्या फ्युचर अँड ऑप्शन्स (F&O) विभागातील सहभागामुळे देशातील गुंतवणूकदारांना दररोज 6.84 कोटी रुपयांचे म्हणजेच दरवर्षी 60,000 कोटी रुपयांपर्यंतचे नुकसान होत आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) आयोजित केलेल्या कार्यक्रमात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) प्रमुखांनी हा खुलासा केला.
सेबीच्या अध्यक्षा म्हणाल्या की, जर F&O विभागाला दरवर्षी 50,000-60,000 कोटी रुपयांचे नुकसान होत असेल, तर हा व्यापक मुद्दा का नाही? ही रक्कम आगामी आयपीओ, म्युच्युअल फंड किंवा इतर उत्पादक हेतूंमध्ये गुंतवता आली असती.
SEBI च्या अभ्यास अहवालानुसार 90 टक्के व्यवहार तोट्यात होते. भांडवली बाजार नियामकाने मंगळवारी एक सल्लापत्र प्रसिद्ध केले, ज्यामध्ये या व्यवहारांवर मर्यादा घालण्याचे मार्ग सुचवले गेले. बुच म्हणाल्या की जरी कमी F&O मुळे स्टॉक एक्स्चेंजला कमी शुल्क मिळू शकते, परंतु दीर्घकाळात ते सर्व भागधारकांसाठी फायदेशीर ठरेल.
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी बँक ग्राहकांप्रमाणे केवायसी पडताळणीचा वापर करण्याची शक्यता माधबी पुरी बुच यांनी नाकारली, असे सांगून सेबी सिक्युरिटीज मार्केटमध्ये पेटीएम सारख्या कंपन्यांना परवानगी देणार नाही. त्या म्हणाल्या की, पेटीएममध्ये काय झाले ते आपण सर्वांनी पाहिले आहे.
कार्यक्रमादरम्यान त्या म्हणाल्या की, 'आम्ही आमच्या मार्केटमध्ये पेटीएमसारखी समस्या येऊ देणार नाही, असे सांगितले आहे. बँकिंग व्यवस्थेत KRA सारखी यंत्रणा नसल्यामुळे पेटीएमची समस्या पेटीएमपर्यंतच राहिली आहे.
याचा विस्तार इतर बँकांमध्ये झाला नाही. पण जर आम्ही पेटीएमला आमच्या सिस्टीममध्ये येऊ दिले आणि केआरए केले नाही तर ते संपूर्ण सिस्टीम भ्रष्ट करेल. आम्ही याची परवानगी देऊ शकत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.