Hudco Stock Price: हुडकोचे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात शेअर्समध्ये 20 टक्के वाढ

Hudco Stock Price: हुडकोचे (Housing and Urban Development Corporation Ltd) शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अतिशय लकी ठरलेत. गुरुवारी सुरुवातीच्या व्यापारात शेअरमध्ये सुमारे 20 टक्क्यांची वाढ झाली आणि 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक तयार झाला.
Housing and Urban Development Corporation Ltd
Housing and Urban Development Corporation LtdSakal
Updated on

Hudco Stock Price: हुडकोचे (Housing and Urban Development Corporation Ltd) शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अतिशय लकी ठरले आहेत. शेअरमध्ये सुमारे 20 टक्क्यांची वाढ झाली आणि 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे.

कंपनीने नुकताच गुजरात सरकारसोबत करार केला आहे, ज्याअंतर्गत हुडको राज्यातील निवासी आणि शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांना फायनान्सिंग करण्यासाठी 14,500 कोटींपर्यंत गुंतवणूक करणार आहे. याशिवाय कंपनीचे डायरेक्टर (कॉर्पोरेट प्लॅनिंग) यांचा कार्यकाळही वाढवण्यात आला आहे.

कंपनीचे डायरेक्टर (कॉर्पोरेट नियोजन) एम नागराज यांचा कार्यकाळ वाढवण्यास मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडून मंजुरी मिळाल्याचे हुडकोने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत सांगितले आहे. नागराज यांचा विस्तारित कार्यकाळ 1 फेब्रुवारी 2024 पासून त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत 31 जुलै 2027 पर्यंत लागू असेल.

2023 या वर्षात आतापर्यंत हुडकोचे शेअर्स 144 टक्क्यांनी वाढले आहेत. सप्टेंबर 2023 अखेरपर्यंत, कंपनीतील सरकारचा हिस्सा 81.8 टक्के, FIIs 0.65 टक्के आणि DIIs 7.16 टक्के होता. बाकी 10 टक्के हिस्सा पब्लिककडे होता.

Housing and Urban Development Corporation Ltd
KPIL: कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी; हजारो कोटींची मिळाली ऑर्डर

कंपनीतील दोन डेव्हलपमेंट्समुळे शेअर्समध्ये मोठी खरेदी होत आहे. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्सवर हुडकोचे शेअर्स 116 रुपयांच्या वाढीसह उघडले. दिवसभरात या शेअरने सुमारे 20 टक्क्यांच्या वाढीसह 136.70 रुपयांचा नवा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला केला.

एनएई निफ्टीवर हा शेअर 114 रुपयांवर उघडला आणि 136.80 रुपयांवर पोहोचला, जो 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक आहे. हुडको शेअरचा बीएसईवर अप्पर प्राइस बँड 136.89 रुपये आणि एनएसईवर 136.80 रुपये आहे.

Housing and Urban Development Corporation Ltd
Gold Rate: नवीन वर्षात सोन्याची चमक वाढणार; भाव 70 हजारांच्यावर जाणार, काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.