Hyundai Motor IPO: देशातील सर्वात मोठा IPO पुढच्या आठवड्यात येणार; एका शेअरची किंमत किती असणार?

Hyundai Motor IPO next week: देशातील सर्वात मोठ्या IPO ची तारीख समोर आली आहे. एका शेअरची किंमत काय असेल याचा तपशीलही उपलब्ध झाला आहे. सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा Hyundai IPO 14 ऑक्टोबर रोजी उघडेल आणि 17 ऑक्टोबरपर्यंत खुला राहील.
Hyundai Motor IPO next week
Hyundai Motor IPO next weekSakal
Updated on

Hyundai Motor IPO next week: देशातील सर्वात मोठ्या IPO ची तारीख समोर आली आहे. एका शेअरची किंमत काय असेल याचा तपशीलही उपलब्ध झाला आहे. सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा Hyundai IPO 14 ऑक्टोबर रोजी उघडेल आणि 17 ऑक्टोबरपर्यंत खुला राहील.

कंपनीच्या IPO ची किंमत 1,960 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात मोठ्या IPOची गुंतवणूकदार दीर्घकाळापासून वाट पाहत आहेत. या IPO नंतर, कंपनीचे मूल्यांकन 19 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.6 लाख कोटी रुपये होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी मंगळवारी सांगितले की Hyundai Motor India IPO ची किंमत प्रति शेअर रु. 1,865 ते रु. 1,960 दरम्यान असण्याची शक्यता आहे. हा स्टॉक 22 ऑक्टोबर रोजी एक्सचेंजमध्ये लिस्ट केला जाणार आहे.

Hyundai Motor IPO next week
Pakistan Stock Exchange: पाकिस्तानच्या शेअर बाजारात काय घडतयं? भारताला मागे टाकून केला विक्रम
21 वर्षांनंतर ऑटो कंपनीचा IPO

विशेष बाब म्हणजे Hyundai Motors प्रथमच दक्षिण कोरियाबाहेरील देशात आपला IPO आणत आहे. दुसरी खास गोष्ट म्हणजे भारतात 2003 नंतर कार कंपनीचा IPO शेअर बाजारात येत आहे. मारुती सुझुकी 21 वर्षांपूर्वी शेअर बाजारात लिस्ट झाली होती. ह्युंदाईकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

IPO ला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा

तज्ञांच्या मते, IPO ला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. अलिकडच्या काळात आलेल्या सर्व IPO ला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे, अशा परिस्थितीत ह्युंदाईला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

यापूर्वी जेव्हा एलआयसीचा आयपीओ आला होता तेव्हा तोही याच रेंजमध्ये होता. IPO ला प्रचंड प्रतिसाद मिळाला, पण लिस्टिंग तितकी चांगली नव्हती. आता Hyundai चा सर्वात मोठा IPO येणार आहे, त्याची लिस्टिंग कशी असेल हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Hyundai Motor IPO next week
Tata Group: टाटा समूह मोठी कंपनी विकणार? एअरटेल खरेदी करणार कंपनीतील हिस्सा; ग्राहकांना काय फायदा होणार?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.