Hyundai Motor IPO: सणासुदीत कमाईची मोठी संधी! देशातील सर्वात मोठा IPO दिवाळीपूर्वी येणार

Hyundai Motor IPO Price Band: दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल कंपनी Hyundai Motor तिच्या भारतीय उपकंपनी Hyundai Motor India Limited चा IPO आणणार आहे. यासाठी बाजार नियामक सेबीकडून सर्व प्रकारच्या मंजुरी मिळाल्या आहेत.
Hyundai Motor IPO
Hyundai Motor IPOSakal
Updated on

Hyundai Motor IPO Price Band: दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल कंपनी Hyundai Motor तिच्या भारतीय उपकंपनी Hyundai Motor India Limited चा IPO आणणार आहे. यासाठी बाजार नियामक सेबीकडून सर्व प्रकारच्या मंजुरी मिळाल्या आहेत.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील या IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमचे पैसे तयार ठेवले पाहिजेत. दिवाळीपूर्वी कंपनीचा IPO लॉन्च होऊ शकतो. कंपनीचा IPO साधारण 14 ऑक्टोबरला येऊ शकतो.

Hyundai Motor India चा हा IPO सुमारे 25,000 कोटी रुपयांचा आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल. Hyundai Motor India च्या IPO आधी, देशातील सर्वात मोठा IPO भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) होता. त्याचा आकार 21,000 कोटी रुपये होता. यापूर्वी केवळ पेटीएम, कोल इंडिया आणि रिलायन्स पॉवरचे आयपीओ सर्वात मोठे होते.

Hyundai Motor IPO
Gold Rate Today: सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकावर; भू-राजकीय तणावाचा परिणाम, किती वाढले भाव?
24 सप्टेंबरला IPOला मिळाली मंजुरी

भारतात IPO लाँच करण्यापूर्वी, कोणत्याही कंपनीने SEBIकडे मसुदा कागदपत्रे सादर करणे आणि मंजुरी घेणे बंधनकारक आहे. SEBIने 24 सप्टेंबर रोजी कंपनीला IPO लाँच करण्यास मान्यता दिली होती.

या IPOच्या मसुद्याच्या कागदपत्रांनुसार, त्याची प्रवर्तक कंपनी Hyundai Motor ही Hyundai Motor India मधील आपला हिस्सा विकणार आहे. या IPO मध्ये, 14,21,94,700 शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) साठी ठेवले जातील. यामध्ये कंपनी कोणतेही नवीन शेअर जारी करणार नाही.

Hyundai Motor India ने 1996 मध्ये भारतात आपला व्यवसाय सुरू केला. कंपनी सध्या देशात 13 कार मॉडेल्स बनवते आणि विकते. भारतात जवळपास 2 दशकांनंतर ऑटोमोबाईल कंपनीचा IPO येणार आहे. यापूर्वी 2003 मध्ये मारुती सुझुकी इंडियाचा IPO शेअर बाजारात लिस्ट झाला होता.

Hyundai Motor IPO
Stock Market: चीनमुळे भारतीय शेअर बाजारात कोसळतोय का? FII ने विकले 15,243 कोटी रुपयांचे शेअर्स
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

Hyundai Motor India च्या IPO आणि त्याच्या प्राईज बँडशी संबंधित तपशील अजून येणे बाकी आहे. असे असूनही, कंपनीच्या आयपीओबाबत बाजारात आधीच चर्चा आहे. त्याचे GMP देखील 350 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मात्र, जीएमपीचा योग्य अंदाज कंपनीच्या आयपीओची प्राईज बँड जाहीर झाल्यानंतरच येईल.

मात्र, कंपनीचे शेअर्स प्रीमियमवर लिस्ट केले गेले तर त्यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. असे विश्लेषकांचे मत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.