Hyundai IPO: ह्युंदाई LICचा रेकॉर्ड मोडणार? कंपनी भारतातील सर्वात मोठा IPO आणण्याच्या तयारीत

Hyundai IPO: देशातील दुसरी सर्वात मोठी कार कंपनी Hyundai Motors India IPO लाँच करण्याच्या तयारीत आहे. दक्षिण कोरियन कंपनीची भारतीय शाखा IPO लाँच करण्याची शक्यता आहे.
hyundai motor ipo may open on this diwali check all details here
hyundai motor ipo may open on this diwali check all details hereSakal
Updated on

Hyundai IPO: देशातील दुसरी सर्वात मोठी कार कंपनी Hyundai Motors India IPO लाँच करण्याच्या तयारीत आहे. दक्षिण कोरियन कंपनीची भारतीय शाखा IPO लाँच करण्याची शक्यता आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालात असे म्हटले आहे की Hyundai Motors India चा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असू शकतो. सध्या, विमा कंपनी LIC चा IPO हा देशातील सर्वात मोठा IPO आहे, ज्याचा आकार 21,000 कोटी रुपये होता.

20 टक्क्यांपर्यंत स्टेक विकले जाऊ शकतात

बँकर्सनी Hyundai Motors Indiaचे मूल्य 22 ते 28 अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कंपनी IPO मधील 15 ते 20 टक्के हिस्सेदारी विकू शकते आणि तिचे मूल्य रु 27,390 कोटी ते रु 46,480 कोटी असू शकते. मात्र, ह्युंदाई ग्लोबलकडून याबाबत कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

hyundai motor ipo may open on this diwali check all details here
Kerala Budget 2024: केरळचा मोठा निर्णय! खाजगी गुंतवणुकीसाठी दरवाजे केले खुले; अर्थसंकल्पात 'या' मुद्द्यांवर भर

कंपनीचा IPO कधी येणार?

कंपनीच्या भारतीय युनिटने आयपीओ लाँच करण्याची तयारी करत आहे. दिवाळीच्या आसपास भारतीय बाजारपेठेत IPO लाँच केला जाईल. सध्या देशातील सर्वात मोठा IPO LIC चा होता, ज्याची किंमत 21 हजार कोटी रुपये होती. असा दावा केला जात आहे की Hyundai आणखी मोठा IPO लाँच करण्याच्या तयारीत आहे.

hyundai motor ipo may open on this diwali check all details here
Paytm Share: गुंतवणूकदार चिंतेत! पेटीएम शेअर्स आजही लोअर सर्किटवर; दोन दिवसांत 40 टक्क्यांची घसरण

या प्रकरणाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, Hyundai ने IPO साठी जगातील 4 प्रमुख बँकिंग सल्लागारांची मदत घेतली आहे. बँक ऑफ अमेरिका, मॉर्गन स्टॅनले, गोल्डमन सॅक्स आणि जेपी मॉर्गन यांच्यासह अनेक गुंतवणूक सल्लागारांनी दक्षिण कोरियाची राजधानी सियोल येथे कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांना IPO बाबतचा मसुदा आणि प्रस्ताव दाखवला आहे.

कंपनीचे मूल्य काय आहे?

Hyundai चा IPO अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे, जो बाजारासह अनेक घटकांवर अवलंबून आहे. आयपीओसाठी कंपनीचे मूल्यांकनही केले जात आहे. IPO वर लक्ष ठेवणाऱ्या वित्तीय संस्थांचा असा विश्वास आहे की Hyundai चे बाजारमूल्य अंदाजे 22 ते 28 अब्ज डॉलर्स (सुमारे 2.32 लाख कोटी रुपये) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.