आयसीआयसीआय बँकेचे ( ICICI Bank) मार्केट कॅप 8 लाख कोटीच्या पुढे गेले आहे. हा टप्पा पार करणारी ही पाचवी भारतीय कंपनी आणि दुसरी भारतीय बँक ठरली आहे. अपेक्षेपेक्षा चांगल्या तिमाही निकालांमुळे, सोमवारी बीएसईवर बँकेचे शेअर्स 4 टक्क्यांनी वाढले आहेत. सकाळी बीएसईवर शेअर 1109.35 रुपयांच्या वाढीसह उघडला. दिवसभरात, त्याच्या मागील बंद किंमतीपेक्षा 5 टक्क्यांनी वाढ झाली आणि 1,163.25 रुपयांच्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. बँकेचे मार्केट कॅप 8.14 लाख कोटीपेक्षा जास्त झाले आहे.
आतापर्यंत फक्त रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि भारती एअरटेलला 8 लाख कोटीचे मार्केट कॅप ओलांडण्यात यश आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज सध्या सुमारे 20 लाख कोटीच्या मार्केट कॅपसह भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे.
मार्च 2024 च्या तिमाहीत बँकेचा कंसोलिडेटेड निव्वळ नफा 11,672 कोटी होता, जो वार्षिक तुलनेत 18.5 टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 9,853 कोटी होता. स्टँडअलोन आधारावर निव्वळ नफा मार्च 2024 तिमाहीत 10,708 कोटी होता, जो मार्च 2023 तिमाहीत 9,122 कोटींवरून 17.4 टक्क्यांनी वाढला आहे. या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्नात वार्षिक 8.1 टक्के वाढ झाली आहे.
अशात ब्रोकरेजचा आयसीआयसीआय बँकेवरील विश्वास दृढ झाला आहे, ब्रोकरेजने आयसीआयसीआय बँकेच्या स्टॉकचे टागरेट वाढवले आहे. एमके ग्लोबलनेने शेअरचे टारगेट 1,400 रुपयांवरून 1,450 रुपये प्रति शेअर केली आहे. मोतीलाल ओसवाल यांनी हेच टारगेट 1,250 रुपयांवरून 1,300 रुपयांपर्यंत वाढवले आहे. जेपी मॉर्गनने 'ओव्हरवेट' रेटिंगसह 1,300 रुपये, नोमुराने 'बाय' रेटिंगसह 1,335 रुपये आणि बर्नस्टीनने 'मार्केट परफॉर्म' रेटिंगसह 1,150 रुपये टारगेट निश्चित केले आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.