IDFC FIRST Bank: IDFC विलीनीकरण झाले पूर्ण; गुंतवणूकदारांना होणार मोठा फायदा, किती शेअर्स मिळणार?

IDFC Merger with IDFC FIRST Bank: IDFC फर्स्ट बँक आणि IDFC लिमिटेडचे ​​विलीनीकरण पूर्ण झाले आहे. या विलीनीकरणामुळे भागधारकांना फायदा होणार आहे. IDFC च्या प्रत्येक भागधारकाला 100 शेअर्सच्या बदल्यात IDFC बँकेचे 155 शेअर्स दिले जातील.
IDFC Merger with IDFC FIRST Bank
IDFC Merger with IDFC FIRST BankSakal
Updated on

IDFC Merger with IDFC FIRST Bank: IDFC फर्स्ट बँक आणि IDFC लिमिटेडचे ​​विलीनीकरण पूर्ण झाले आहे. या विलीनीकरणामुळे भागधारकांना फायदा होणार आहे. IDFC च्या प्रत्येक भागधारकाला 100 शेअर्सच्या बदल्यात IDFC बँकेचे 155 शेअर्स दिले जातील. या विलीनीकरणामुळे IDFC ची कॉर्पोरेट रचना अधिक चांगली होणार आहे. या सोबतच प्रवर्तकांचे होल्डिंग कमी होणार आहे.

IDFC फर्स्ट बँकेने शुक्रवारी हे विलीनीकरण पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. शेअरधारक आणि नियामकांच्या मंजुरीनंतर पुढील महिन्यापासून हे विलीनीकरण लागू केले जाईल, असे बँकेने म्हटले आहे. IDFC ने शेअर्सच्या देवाणघेवाणीसाठी 10 ऑक्टोबर ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. हे शेअर्स 31 ऑक्टोबरपूर्वी भागधारकांना दिले जातील.

IDFC Merger with IDFC FIRST Bank
Google: नोकरी सोडलेल्या कर्मचाऱ्यापुढे गुगल झुकलं; 22,000 कोटी रुपये देऊन परत बोलावलं, पण का?

या विलीनीकरणामुळे सर्वात मोठा फायदा हा होणार आहे की, बँकेची कोणतीही होल्डिंग कंपनी राहणार नाही. बँकेने म्हटले आहे की, आता आमचे शेअरहोल्डिंग इतर मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकांप्रमाणे होईल. इतर खाजगी क्षेत्रातील बँकांमध्येही प्रमोटर होल्डिंग नाही. याशिवाय बँकेचे व्यवस्थापनही सोपे होणार आहे.

विलीनीकरणामुळे बँकेला 600 कोटी रुपये मिळणार

या विलीनीकरणामुळे बँकेला सुमारे 600 कोटी रुपये मिळणार आहेत. आयडीएफसी फर्स्ट बँकेचे एमडी आणि सीईओ व्ही वैद्यनाथन म्हणाले की, आम्ही जवळपास दोन वर्षांपासून या विलीनीकरणासाठी प्रयत्न करत होतो. खूप मेहनतीनंतर आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आहोत.

IDFC Merger with IDFC FIRST Bank
Tata Factory Fire: टाटा समूहाच्या आयफोन प्लांटला भीषण आग; 100हून अधिक पोलिस तैनात, पाहा- VIDEO

आम्हाला पूर्ण आशा आहे की या विलीनीकरणामुळे भविष्यात बँकेला मोठा फायदा होईल. आम्ही आमच्या ग्राहकांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देऊ शकू. आमची कॉर्पोरेट रचना आता या क्षेत्रातील इतर आघाडीच्या बँकांसारखी होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.