Penny Stock: शेअर बाजारात पेनी स्टॉकबाबत गुंतवणुकदार म्हणावे तितके सकारात्मक दिसत नाही. कारणही तसंच आहे, पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक ही धोक्याची मानली जाते. पण काही पेनी स्टॉक्सने त्यांच्या गुंतवणुकदारांना न भुतो न भविष्यती इतका परतावा मिळवून दिला आहे.
असाच एक पेनी स्टॉक आहे आयएफएल एंटरप्रायझेसचा (IFL Enterprises). या स्टॉकने अतिशय कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे.
आता कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्स आणि डिव्हिडेंड जाहीर केला आहे. गेल्या शुक्रवारी हा शेअर 4.78 टक्क्यांच्या घसरणीसह 6.97 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप 158 कोटी आहे.
आयएफएल एंटरप्रायझेसच्या बोर्डाने पूर्ण पेड-अप इक्विटी भागधारकांना 01:10 च्या प्रमाणात बोनस शेअर्स मंजूर केले आहेत. कंपनीने बोनस शेअर्स देण्याची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही.
याव्यतिरिक्त, मंडळाने 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी 1 रुपये फेस व्हॅल्यूवर 0.0001 रुपये अंतरिम डिव्हिडेंड घोषित केला आहे. कंपनीने 11 नोव्हेंबर 2023 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
गेल्या एका महिन्यात आयएफएल एंटरप्रायझेसचे शेअर्स 51 टक्क्यांनी घसरले आहेत. हा शेअर गेल्या 6 महिन्यांत 46 टक्क्यांनी घसरला आहे. पण या शेअरने 2 वर्षात 450%, 3 वर्षात 610% आणि 5 वर्षात 1520% असा मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
आयएफएल एंटरप्रायझेसने तिमाही निकाल (Q4) आणि वार्षिक निकालात (FY23) उत्कृष्ट आकडेवारी सादर केली आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये नेट प्रॉफीट 0.51 कोटी नोंदवला गेला, तर आर्थिक वर्ष 2022 मध्ये 0.21 कोटीचा निव्वळ तोटा झाला होता.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.